Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

Goa Police: पोलिसांच्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: कांदोळी येथील ब्लू बेल बीच रिसॉर्ट चालवण्यासाठी ब्लू बेल हॉस्पिटॅलिटी कंपनीमध्ये भागीदारीसाठी गुंतवलेल्या ३५ लाख रुपये रकमेची अफरातफर करण्यात आल्याने हरियाणामधील व्यक्तीसोबत फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी एकूण सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. तर कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी १७ एप्रिल २०२४ रोजी भादंसंच्या ४२०, ४०३, ४०६, १२० ब व ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. स्वप्नील देसाई, अलझिरा देसाई, प्रियावर्धन जोशी, सचिन बागरिया, संगीता बागरिया व दृपद पटेल या सहाजणांचा वरील गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून समावेश आहे.

वरील कालावधीत संशयितांनी कटकारस्थान रचले. फिर्यादी मनप्रीत सिंग (फरिदाबाद, हरियाणा) यांना ब्लू बेल बीच रिसॉर्ट चालवण्यासाठी ब्लू बेल हॉस्पिटॅलिटी कंपनीमध्ये भागीदार बनवण्याची ऑफर संशयित स्वप्नील देसाई याच्यामार्फत देण्यात आली. या भागीदारीसाठी संशयितांनी फिर्यादींना रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. फिर्यादी सिंग यांनी वरील कालावधीत भागीदारी खात्यात ३५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

त्यानंतर अप्रामाणिकपणे आणि फसवणूक करीत संशयित अलझिरा देसाई, सचिन बागरिया, संगीता बागरिया व दृपद पटेल या चारजणांनी आपल्या फायद्यासाठी रक्कम हस्तांतरित केली आणि भागीदारी फर्मच्या ३५ लाख रुपये रकमेचा गैरवापर करून फिर्यादीची फसवणूक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT