Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मुंगुल गँग वॉरचा आरोपी आता 'पोक्सो'च्या कचाट्यात! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी कुख्यात अमर कुलालच्या आवळल्या मुसक्या

Amar Kulal Arrest: दवर्लीत 2024 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अमर कुलाल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Manish Jadhav

Amar Kulal Arrest: दवर्लीत 2024 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अमर कुलाल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फातोर्डा पोलिसांनी सापळा रचून अमरच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला मायणा-कुडतरी पोलिसांच्या स्वाधीन केले. या अटकेमुळे परिसरात खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये दवर्ली परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र आरोपी अमर कुलाल पोलिसांना गुंगारा देत होता. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे फातोर्डा पोलिसांनी अमरला शोधून काढले आणि त्याला अटक केली. हे प्रकरण एका अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत वेगाने सूत्रे हलवली.

मुंगूल गँग वॉरचे कनेक्शन

अमर कुलाल हा पोलिसांच्या दप्तरी नवा चेहरा नाही. यापूर्वी मडगावजवळील मुंगुल येथे झालेल्या कुख्यात 'गँग वॉर' (टोळीयुद्ध) प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती. मुंगुल गँग वॉर प्रकरणाने संपूर्ण गोवा हादरला होता. मात्र, काही काळापूर्वी अमरची जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर बाहेर असतानाही त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आता त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याने अमर कुलालच्या अटकेकडे पोलीस मोठे यश म्हणून पाहत आहेत.

मायणा-कुडतरी पोलिसांकडून तपास सुरु

फातोर्डा (Fatorda) पोलिसांनी अमरला अटक केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला मायणा-कुडतरी पोलिसांकडे सोपवले आहे, कारण गुन्ह्याची मूळ हद्द त्यांच्या अखत्यारीत येते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या प्रकरणात आता अमरवर 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर पैलूंचा शोध घेत असून, या गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली होती का, याचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे दवर्ली आणि मडगाव परिसरात संतापाची लाट पसरली आहे. जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा समाजात वावरताना अशा प्रकारचे जघन्य गुन्हे करत असल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बनावट गिऱ्हाईक बनून पोलीस पोहोचले अन्... गोव्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची केली सुटका; दलालांचे धाबे दणाणले

अपहरण, जबरदस्ती अन् पाशवी अत्याचार! आर्केस्ट्रात काम करणाऱ्या तरुणीची 6 नराधमांनी लुटली अब्रु; पूर्णियाात ओलांडली क्रौर्याची सीमा

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT