Goa Crime News A dead body was discovered at Baga Beach in Calangute  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बागा समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हिंसक घटना घडल्याचा संशय; पोलिस घटनास्थळी दाखल

Baga Beach: बागा समुद्रिकानाऱ्यावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

बागा समुद्रिकानाऱ्यावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बागा समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याचा तपास पोलिस करतायेत. या व्यक्तीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. हिंसक घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांबरोबर यावेळी फॉरेन्सिक टीमही उपस्थित आहे. पोलिस आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून मदतीने पुढील तपास करतायेत. हा व्यक्ती गोव्यातील आहे का बाहेरचा आहे? त्याचा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला? खून करण्यामागे काय हेतू होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहे.

काही दिवसांपूर्वी पेडण्यातील तेरेखोल नदीत झारखंडच्या कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने अशीच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हा खूनाचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला होता. तेरेखोल नदीत झारखंडच्या कामगाराचा मृतदेह आढळल्याने त्याचा देखील खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता.

वाडे-दाबोळीतील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरण

वाडे-दाबोळी येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात दोन आरोपींना बलात्‍कार आणि खूनाच्या आरोपाखाली अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT