Goa Crime dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मेरशी सर्कलजवळ अज्ञाताने गळफास घेऊन संपवले जीवन, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; पोलिस तपास सुरु

Goa Crime News: मेरशी सर्कलजवळ सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात गळफास घेऊन आत्महत्या केलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मेरशी सर्कलजवळ सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात गळफास घेऊन आत्महत्या केलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने त्याची ओळख पटवण्यापलीकडे आहे.

शवचिकित्सेसाठी तो गोमेकॉ इस्पितळातील फोरेन्सिक मेडिसीन विभागात पाठवला आहे. प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती बुधवारी (11 डिसेंबर) दुपारी १.३० वा.च्या सुमारास मिळाल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

मेरशी येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपांत मृतदेह लोंबकळत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला आली होती. त्यानुसार जुने गोवे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मृतदेहाची पाहणी केल्यास तो कुजलेल्या अवस्थेत होता व दुर्गंधी येत होती. मृतदेहाच्या शरीरावर लांब बाह्याचा शर्ट तसेच लांब पँट होती. कपड्याच्या दोरीने गळफास घेण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT