मडगाव: अल्पवयीन मुलीचे अपहरण व लैंगिक अत्याचार करून तिला मुंबईत सोडून देण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी मुंबईत सापडल्यानंतर तिने आपल्यावर गुदरलेल्या अत्याचाराचा पाढा वाचल्याने या अत्याचाराला वाचा फुटली.
मायणा-कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाची ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास या पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली. पीडित मुलगी १५ वर्षांची असून संशयित चमन राम हा मूळ झारखंड राज्यातील आहे. दोघेही एकमेकांना परिचित होते.
संशयिताने तिला घरातून पळवून नेले. मागाहून बसने मडगाव कदंब बसस्थानक गाठले. तेथून पुन्हा बसने दोघेही मडगाव रेल्वेस्थानकावर आले व मग रेल्वेने मुंबईला गेले. तेथे त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला एकटीच सोडून संशयित पसार झाला.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तपासात ती मुलगी मुंबईला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले. संशयिताने त्या मुलीचा मोबाईलही पळविल्याचे उघड झाले आहे.
संशयित चमन राम याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या १३७ (२), ६५ (१), बालसंरक्षण कायदा कलम ४ व गोवा बाल कायदा कलम ८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनल गावकर पुढील तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.