Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी 'मास्टरमाईंड'ला 7 दिवसांची पोलिस कोठडी, संशयित बंगळूरुतून अटकेत; डिचोली पोलिसांची कारवाई

Mhavalinge Child Murder: म्हावळींगे येथील अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताला न्यायालयाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली.

Manish Jadhav

Goa Crime News: म्हावळींगे येथील अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताला न्यायालयाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. या संशयिताला डिचोली पोलिसांनी बंगळूरु येथून अटक केली असून या खूनप्रकरणी संशयित 'मास्टरमाईंड' असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी म्हावळींगे येथे झालेल्या दोन वर्षे 7 महिन्याच्या मुलीच्या हत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पंधरा दिवसांनंतर डिचोली (Bicholim) पोलिसांनी या खूनप्रकरणी आणखी एका कर्नाटकमधील संशयित युवकाला अटक केली. संशयित युवकाला बंगळुरु येथून ताब्यात घेतले. पीआय विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रश्मीर मातोंडकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई करुन संशयित आरोपीला मोठ्या शिताफिने अटक केली.

गेल्या 15 ऑक्टोबर रोजी म्हावळींगे येथे जन्मदात्या आईनेच स्वतःच्या अडीच वर्षीय मुलीचा गळा घोटला होता. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी तपासाला गती देताना दुर्देवी बालिकेची आई नागम्मा रवी व्ही. आणि तीचा प्रियकर नितीनकुमार पुजारा (दोघेही मूळ कर्नाटक) यांना यापूर्वीच अटक केली. मात्र आता या कोठडीमुळे पोलिसांना खूनाचा संपूर्ण कट, त्यामागील उद्देश (Motive) आणि गुन्ह्यात 'मास्टरमाईंड'ची नेमकी भूमिका काय होती, याचा सखोल तपास करण्यास मदत मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT