Mapusa Property Dispute  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ''मी मायकलच्या मालमत्तेचा काळजीवाहू''; खोराटेंनी आरोप फेटाळले, म्हणाले 'राहायचं असेल तर कायदा पाळा'!!

Khorate Denies Allegations: जनार्दन खोराटे यांनी माध्यमांसमोर येत हा गुन्हा खोटा असल्याचा दावा केला आहे

Akshata Chhatre

म्हापसा: मायकवाडा, हणजूण येथे राहणाऱ्या राजेश सिनारी व त्यांच्या पत्नी ब्रोंविन सिनारी यांनी त्यांना राहत्याघरातून गुंडांकरवी हाकलून लावल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी जनार्दन खोराटे आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र आता जनार्दन खोराटे यांनी माध्यमांसमोर येत हा गुन्हा खोटा असल्याचा दावा केला आहे असे म्हणत ते या मालमत्तेचे काळजीवाहू असल्याचे सांगत त्यांनी राजेश सिनारी व त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

जनार्दन खोराटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना ते या मालमत्तेचे काळजीवाहू असल्याचे म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी त्याच्याजवळ असलेली कागदपत्रं दाखवत राजेश सिनारी व त्यांच्या पत्नीने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

या परिषदेत जनार्दन खोराटे यांच्यासोबत मालमत्तेचे मालक मायकल पीटर यांचे चुलत भाऊ डेव्हीड पीटर हे देखील उपस्थित होते. जनार्दन खोराटे यांनी त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना तसे पुरावे देण्याचे आव्हान केले आहे आणि स्वतःचा हक्क सिद्ध करतांना त्यांनी काही दस्तऐवज आणि मालकाचे व्हिडीओज माध्यमांना दाखवलेत.

मालमत्ताचे मालक पीटर यांनी सर्व हक्क माझ्याकडे दिले आहेत. राजेश सिनारी व त्यांच्या पत्नी ब्रोंविन सिनारी कुणाच्याही परवानगीशिवाय तिथे येऊन राहत आहेत, त्यांना जर का घरात राहायचं असेल तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा खोटे आरोप करू नये असं जनार्दन खोराटे परिषदेत म्हणाले. यासोबतच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रसारमाध्यमांना आणि जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आणि संभाव्य दिशाभूल करणारी माहिती खरी म्हणण्यापूर्वी वस्तुस्थितीची पडताळणी करण्याची विनंती केली आहे. जनार्दन खोराटे यांनी घटनेची पडताळणी करताना निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्यावर भर दिला आहे, तसेच शेवटी सत्य समोर येईलच असा विश्वास व्यक्त केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik’s Asthi Visarjan: खांडेपार नदीत दिवंगत रवी नाईक यांच्या अस्थींचे विसर्जन

Goa Mining: खूषखबर! राज्य खाण तयारी निर्देशांकात गोवा अव्वल; उद्योगवाढीची केंद्राला अपेक्षा

Donald Trump Oil Claim: 'भारत रशियाकडून तेलाची खरेदी थांबवणार'! ट्रम्प यांच्या नवा दाव्यामुळे चर्चेला उधाण

वाळूमाफियांना बसणार चाप! जनतेसाठी हेल्पलाईन जाहीर; तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक जाणून घ्या..

Horoscope: बुधादित्य योग! 'या' राशींना होणार मोठा फायदा; धन प्राप्तीसाठी उत्तम वेळ

SCROLL FOR NEXT