Goa Teacher Beats Student Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला पीटीच्या शिक्षकाकडून मारहाण; म्हापसा पोलिसांकडून गुन्हा नोंद

Mapusa Police File Complaint Against Teacher: कोजुर्वे, हळदोणा येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

कोजुर्वे, हळदोणा येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पीटीच्या शिक्षकाने ही मारहाण केली. मुलाच्या अंगावर अनेक ठिकाणी व्रण दिसत आहेत. मुलाच्या पालकांना घटनेबद्दल कळताच त्यांनी तात्काळ शिक्षकाविरुद्ध पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पालकांनी मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध (Teacher) रिसतर तक्रार नोंदवली. म्हापसा पोलिसांनीही तक्रारीची दखल घेत घटनास्थळी पोहोचून शिक्षकाला ताब्यात घेतले. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करतायेत.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकारच्या घटना समोर येतायेत. काही दिवसांपूर्वी, कामुर्ली येथील एका प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोन शिक्षिकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करत ताब्यात घेतले होते.

विद्यार्थ्याने (Student) वहीची दोन पाने फाडल्याचा राग आल्याने संतप्त शिक्षिकेने या पीडिताला बेदम मारहाण केली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 126(2), 351(2) व 3(5) तसेच गोवा बाल कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

कोलवाळ पोलिसांच्या माहितीनुसार, कामुर्ली येथील एका खासगी प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने जबर मारहाण केली. तिने स्टीलच्या पट्टीने मुलाच्या हाता-पायावर तसेच पाठीवर मारहाण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Yashasvi Jaiswal Century: दक्षिण आफ्रिकेची 'डोकेदुखी' वाढली! कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वालचा 'मास्टरस्ट्रोक', ठोकलं शानदार शतक

Horoscope: मालामाल व्हा! कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार दान करा 'या' वस्तू; देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

DGCA Ticket Rules Change: 48 तासांत मोफत कॅन्सलेशन, 21 दिवसांत मिळणार रिफंड... विमान प्रवासाचे 7 नियम बदलले; कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT