Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: म्हापसा पोलिसांची छापेमारी! 3 लाखांच्या गांजासह दोघेजण अटकेत; जानेवारी महिन्यात 13.69 लाखांचा अंमली पदार्थ जप्त

Mapusa Police Drug Bust: माडानी-पर्रा येथे शुक्रवारी (31 जानेवारी) म्हापसा पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी तब्बल 3 लाखांचा गांजा जप्त केला.

Manish Jadhav

Ganja Seized in Goa: राज्यात गेल्या काही दिवसात गोवा पोलिसांच्या बेकायदेशीर ड्रग्जविरोधातील कारवाया वाढल्या आहेत. राज्यातील वाढत्या ड्रग्जच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलिस ठिक-ठिकाणी छापेमारी करतायेत. याचदरम्यान, माडानी-पर्रा येथे शुक्रवारी (31 जानेवारी) म्हापसा पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी तब्बल 3 लाखांचा गांजा जप्त केला.

तीन लाखांचा गांजा आणि दोघेजण अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, माडानी-पर्रा येथील बेकायदेशीर गांजा तस्करांची म्हापसा पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. ज्यामध्ये पोलिसांच्या हाती साडेतीन किलो गांजा लागला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत 3 लाख होते. याशिवाय, या छापेमारीत पोलिसांना दोघांच्या मुसक्या आवळण्यातही यश आले. सुख माझी (वय वर्ष, 21) आणि चंदन सेठी ( वय वर्ष, 23) अशी या संशयितांची नावे आहेत. जानेवारी महिन्यात पोलिसांनी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी 10 जणांना अटक केली. तर 13.69 लाखांचे ड्रग्ज जप्त केले.

46,000 च्या हेरॉईनसह एकाला अटक

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कळंगुट (Calangute) पोलिसांनी केलेल्या छापेमारीत जॉन अँटोनियो लोपेझला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून 46,000 किमतीचे 4.6 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. पीएसआय अक्षय पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Balli Panchayat: 11 महिन्यांत 11 सचिवांची बदली, बाळ्ळी पंचायतीच्या कारभारावर विपरित परिणाम

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

SCROLL FOR NEXT