Goa sexual assault Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जॉब देतो सांगून केला लैंगिक अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची दिली धमकी; 40 लाखही उकळले

Sexual assault case Goa: सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. पाजीफोंड येथे त्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: चांगल्या प्रकाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्हापसा येथील एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चौघाजणांवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात एका महिलेचाही सहभाग आहे.

पीडितेवर लैंगिक अत्याचार करताना संशयितांनी त्या कृत्याचा व्हिडिओ काढला. नंतर तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून तिच्याकडून ४० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राज प्रशांत ठाकूर, अँथनी डिसोझा, सिद्धार्थ कांबळी आणि ज्योती नागवेकर अशी संशयितांची नावे आहेत.

भारतीय न्याय संहितेच्या ६१२ (२), ६४ व ३५१ (२) कलमांखाली सर्व संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. देविदास या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. पाजीफोंड येथे त्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाला होता.

चाळीस लाख रूपये उकळले

या युवकाने आपल्याला अन्य मुलींना कामासाठी आणण्यास भाग पाडले. तसेच त्या मुलींकडूनही त्याने सुरुवातीला शुल्क म्हणून साडेसात हजार रुपये वसूल करून घेतले. त्यानंतर मला आणखी मुली कामासाठी आण, असे सांगून धमकावण्यात आले.

परंतु मी आणखी मुली आणू शकत नसल्यामुळे त्याने माझ्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने मला मडगाव येथील फ्लॅटवर आणून लैंगिक अत्याचार केले आणि चाळीस लाख रुपयेही उकळले, असे पीडित युवतीने तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

SCROLL FOR NEXT