Madgaon Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावातून 1 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त; तामिळनाडूमधला युवक पोलिसांच्या तावडीत

Madgaon Crime News: मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालभाट येथील परिसरात दामोदर लॉजच्या मागे गणेशनच्या ताब्यात असलेला गांजा त्यांच्या हाती लागला.

Akshata Chhatre

Margao drugs seized Tamil Nadu youth arrested

मडगाव: मडगाव पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात छापा टाकत मालभाट तामिळनाडू मधल्या अरुण प्रसाद गणेशन नावाच्या ३० वर्षीय युवकाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी (दि. २७ डिसेंबर) दुपारी १-१:३० च्या सुमारास सुरु झालेली ही कारवाई ३:२५ पर्यंत चालली. पोलिसांनी अरुण प्रकाश गणेशन याच्याजवळून १,०९६ ग्रामचा गांजा जप्त केला आहे, ज्याची आंतराष्ट्रीय बाजारात १ लाख ०९ हजार ६०० एवढी भारी भारकाम किंमत आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालभाट येथील परिसरात दामोदर लॉजच्या मागे गणेशच्या ताब्यात असलेला गांजा त्यांच्या हाती लागला.

अरुण प्रकाश गणेशन यांच्याजवळ गांजा सारखा अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती, मिळालेल्या माहितीवर अंमलबजावणी करत पोलीस मालभाट मडगाव येथे दाखल झाले असता आरोपी त्यांच्या हाती सापडला.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर मडगाव पोलीस स्थानकात आरोपी गणेशन याच्या विरोधात गुन्हा क्रमांक १२१/२०२४ एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(b)(ii)(B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्वोच्य न्यायालयाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे पालन करत पोलिसांनी त्याला शनिवारी सकाळी ८:१० वाजता अटक केली आहे आणि अटकेनंतर संपूर्ण माहिती आरोपीच्या परिवारापर्यंत देखील पोहोचवण्यात आली आहे. सध्या पीएसआय नीलेश शिरवोईकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT