goa car theft racket Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: भाडयाची फॉर्च्युनर, जंगलात बदलली नंबरप्लेट, आलिशान गाड्या चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 2 परप्रांतीयांना अटक

Goa crime car theft racket: गोव्यातून भाड्याने घेतलेल्या आलिशान गाड्यांची नंबर प्लेट बदलून त्या परराज्यात घेऊन जाणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात गोवा पोलिसांना यश

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्यातून भाड्याने घेतलेल्या आलिशान गाड्यांची नंबर प्लेट बदलून त्या परराज्यात घेऊन जाणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात गोवा पोलिसांना यश आलं आहे. कोलवाळ पोलिसांनी याप्रकरणी गुजरात आणि राजस्थानमधील दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडले आहे, मात्र त्यांचे काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

आलिशान गाड्यांची नंबर प्लेट बदलण्याचा डाव उधळला

ही घटना म्हापसा येथील करासवाडा येथील एका जंगली भागात घडली. कोलवाळ पोलीस निरीक्षक संजित कंदोळकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोन टोयोटा फॉर्च्युनर गाड्यांची नंबर प्लेट बदलली जात असल्याची खबर मिळाली होती.

या गाड्या कळंगुट आणि कांदोळीमधून भाड्याने घेतल्या होत्या. आरोपींनी गोव्याची (GA) नंबर प्लेट काढून त्याऐवजी राजस्थान (RJ) आणि पंजाबची (PB) नंबर प्लेट लावण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. मात्र, याचवेळी त्यांचे काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही टोळी आंतरराज्यीय वाहन चोरीच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

SCROLL FOR NEXT