Goa Crime Leopard terror in Nirankal area in Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: फोंड्यातील निरंकाल भागात बिबट्याचा धुमाकूळ; कुत्र्यांचा पाडला फडशा

Ponda Crime: फोंड्यातील निरंकाल भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Crime: फोंड्यातील निरंकाल भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी तो पाळीव प्राण्‍यांची शिकार करत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. गवळवाडा, शिगणेव्हाळ, मायणे, कोनसे, सातेरीमळ व अन्य भागात बिबट्याचा संचार असून वन खात्याने त्‍याचा ताबडतोब बंदोबस्‍त करावा, अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.

गेल्‍या काही दिवसांपासून हा बिबट्या रात्रीच्या वेळी पाळीव प्राण्‍यांची विशेषतः कुत्र्याची शिकार करत आहे. वरील परिसरातील घरांमध्‍ये लोक मोठ्या प्रमाणात कुत्रे पाळतात. चोरांपासून सुरक्षित राहता यावे यासाठी लोक घराघरांत दोन-तीनपेक्षा अधिक कुत्रे पाळतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून या पाळीव कुत्र्यांची शिकार बिबट्या करत असल्याने लोकांमध्ये चिंता व्‍यक्त केली जात आहे. रात्रीच्‍या वेळी काही वाहनचालकांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे.

दरम्‍यान, वन खात्याने परिसरात सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्‍यात येत आहे.

माणसांचा जीवही धोक्‍यात

काल सोमवारी पहाटे साडेचारच्‍या सुमारास गवळवाडा येथील पास्कोल रॉड्रिगीस यांच्या घरातील पाळीव कुत्रा बिबट्याने पळवून नेला. काही दिवसांपूर्वी अन्य एका कुत्र्याचा फडशा पाडला होता. जवळपास घरे नसल्याने पास्कोल यांनी दोन कुत्रे पाळले होते. पण त्‍या दोन्ही पाळीव कुत्र्यांची बिबट्याने शिकार केल्याने आता या कुटुंबातील लोकांच्‍या जीवालाच धोका निर्माण झाला आहे. कारण हा बिबट्या कधीही माणसावरही हल्ला करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT