Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मेरशीत पुन्हा गँगवॉर; ‘हिस्ट्रीशीटर’चा खून

24 तासांत अल्पवयीनासह पाचजण अटकेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime मेरशीतील कुख्यात गुंड विशाल गोलतकर (39) याचा शनिवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने खून करून वयलेभाट - मेरशी येथील मिनेझिस फॅक्टरीजवळच्या झुडपात त्याचा मृतदेह टाकल्याच्या घटनेने राज्य हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह पाच जणांना अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरशीतील गुंड साई ऊर्फ कोब्रा तुळशीदास खांडेकर (वय 30 वर्षे) आणि विशाल हे दोघे पूर्वी एकाच गुन्हेगारी गटात होते.

नंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. विशाल साईचा तिरस्कार करू लागला. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट वाढत गेले. नंतर साईने विशालचा काटा काढण्याचे ठरवले.

त्यासाठी त्याने शनिवारी रात्री व्यवस्थित नियोजन केले आणि मेरशी येथे एका ठिकाणी विशालला बोलावून घेतले. त्यावेळी त्याने आपल्यासोबत ओमकार पांडुरंग च्यारी (१९), गौरेश नारायण गावस (२५) तुषार तुळशीदास कुंडईकर (३८) यांच्यासह एका अल्पवयीनाला सोबत घेऊन विशालवर धारदार शस्त्राने हल्ला केला. विशालचा खून केल्यानंतर त्यांनी तेथून दीड किलोमीटर वयलेभाट - मेरशी येथील मिनेझिस फॅक्टरीजवळच्या झुडपात त्याचा मृतदेह टाकला.

पुन्हा कारवाया

विशाल याच्यावर चिंबल व मेरशीसह इतर भागांतील हाणामाऱ्या, तोडफोड, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे 8 गुन्हे नोंद आहेत. त्याने चिंबल व मेरशी भागात दहशत निर्माण केली होती.

तेथील काही विरोधी गुन्हेगारी टोळ्यांबरोबर मारहाणीचे गुन्हे पोलिसांत दाखल झाले आहेत. त्याच्यावर काही गुन्ह्यांत खटलेही सुरू आहेत. गुन्हे करून तो जामिनावर सुटला की, त्याच्या कारवाया पुन्हा सुरू व्हायच्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT