BalRath Employees on Strike
BalRath Employees on Strike Dainik Gomantak

Balrath Driver on Strike: संघटना ठाम! बालरथ कामगार आजपासून संपावर

हजार-पाचशेची भीक नको! स्वाती केरकर कडाडल्या
Published on

BalRath Employees on Strike वेतन कामगार संघटनेला नामंजूर असून, आम्हाला हजार-पाचशेची भीक नको! आम्ही संपाच्या निर्णयावर ठाम आहोत, अशी भूमिका युनायटेड बालरथ कामगार युनियन संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी आज स्पष्ट केली.

युनायटेड बालरथ कामगार युनियन संघटनेच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार विविध मागण्यांसाठी उद्या, ता. १७ पासून संपावर जाणार आहेत. या संपात राज्यातील ४२० बालरथांवरील चालक-क्लिनर असे ८४० कामगार सहभागी होणार आहेत.

शिक्षण संचालनालयाच्या नियमांत बदल

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण संचालकांना कामगार संघटनेने संपाची नोटीस चार जुलै रोजी दिली. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे ७ तारखेला शिक्षण संचालकांनी अधिसूचना काढली. परंतु ती अधिसूचना राजपत्रित झाली नाही.

अधिसूचनेनुसार बालरथावरील चालकास १२ हजार आणि वाहकास ६ हजार रुपये वाढीव वेतन दिले आहे. शिवाय दरवर्षी ५ टक्के वाढ देण्याचेही नमूद केले आहे. पूर्वी दहा महिन्यांचे वेतन त्यांना दिले जात होते, ते आता ११ महिन्यांचे मिळणार आहे.

BalRath Employees on Strike
Dudhsagar Waterfall Goa: बंदी असूनही पर्यटकांचे ‘दूधसागर’वर धूमशान

हजार-पाचशेची वाढ अमान्य

शिक्षण संचालनालयाने काढलेल्या अधिसूचनेत केलेली चालकाच्या वेतनातील १ हजार व क्लिनरच्या वेतनातील ५०० रुपयांची वाढ अमान्य आहे.

आमच्या मागणीचा सरकारने पुनर्विचार करावा. हजार आणि पाचशे रुपयांची भीक सरकार देत आहे काय? असा सवाल केरकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com