Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सुडाग्नी...सुरी खुपसून गुप्तांगही कापले! पर्रातील खून प्रकरणी बाप-लेकाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Parra Murder Case: ओडिशातील आपल्याच नातेवाईक कामगाराचा निर्घृणपणे खून केलेल्या बाप व लेकाला बुधवारी (ता.९) म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Sameer Amunekar

म्हापसा: ओडिशातील आपल्याच नातेवाईक कामगाराचा निर्घृणपणे खून केलेल्या बाप व लेकाला बुधवारी (ता.९) म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, हा खून सूड भावनेने अगदी निर्दयपणे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

रात्री साइट सुपरवायझर घटनास्थळी आला असता हा खूनाचा प्रकार उघडकीस आला होता. खून करून दोघेही संशयित पळून जाऊन नजीकच्या शेतात लपून बसले होते. कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. मयत हा संशयित सत्त्याचा भाचा असून फोंडेकवाडा, पर्रा येथे पत्र्याच्या झोपडीत तो राहत होता. सोमवारी (ता.७) रात्री ९च्या सुमारास या झोपडीत द्रौपदचा मृतदेह आढळला होता.

मारहाणीचा बदला...

खुनाच्या आदल्या दिवशी मयत द्रौपद नाईक याने आपला मामा संशयित सत्त्याला म्हापसा बसस्थानकाजवळ मारहाण केली होती. याची माहिती त्याने आपला मुलगा थाबिरला दिल्यानंतर बदला घेण्यासाठी या बाप व लेकाने द्रौपद याला पर्रा येथे झोपडीत गाठून निर्दयपणे ठार मारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

असा केला खून

संशयित सत्त्या नबरंगपुरा (५०) व थाबिर नबरंगपुरा (३१) या दोघांनी मिळून द्रौपद याचा आधी कमर पट्ट्याच्या साहाय्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. परंतु द्रौपदने प्रतिकार केल्याने थाबिरने लोखंडी रॉडने द्रौपदच्या डोक्यावर अनेक वार केले. दरम्यान, सत्त्याने द्रौपदच्या पोटात सुरी खुपसून त्याचे गुप्तांगदेखील कापले.

दिवसभर वादावादी व रात्री मद्यधुंद!

घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी मयत द्रौपदने आपला मामा संशयित सत्त्या याला मारहाण केल्याचे त्याने आपला मुलगा थाबिर याला सांगितले होते. त्यामुळे सोमवारी कामावर सकाळपासून त्या तिघांत खटके व बाचाबाची सुरू होती.

त्यानंतर, रात्री झोपडीत तिघेही दारू पिण्यास बसले होते. तिथे मद्यधुंद बाप-लेकाने द्रौपद याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला संपविले. फोंडेकवाडा येथे एका व्हिलाचे बांधकाम सुरू असून हे तिघेही गवंडी म्हणून कामाला होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assmbly Live: डिलिव्हरी एजन्सी वापरत असलेल्या वाहनांवर इतर राज्यांच्या नोंदणी प्लेट

नातं वाचवण्यासाठी करिश्मा-संजयची गोवा ट्रीप! करीनाचा खुलासा चर्चेत, म्हणाली, 'त्यांना समस्या होत्या'

Sara Tendulkar: 1137 कोटी… सचिनच्या लेकीचा 'मास्टरस्ट्रोक', पर्यटनाला चालना देण्यासाठी करणार काम

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

SCROLL FOR NEXT