Goa Crime:  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist: कळंगुट-बागा येथे मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा; कारच्या बॉनेटवर बसून, टपावर उभा राहून प्रवास...

व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल

Akshay Nirmale

Goa Tourist Traffic Rules Violations: कळंगुट-बागा परिसरात मद्यधुंद पर्यटकांनी धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. दोन वेगवेगळ्या कारमध्ये मद्यधुंद तरूण पर्यटकांनी कळंगुट-बागा परिसरातील रस्त्यावर कार चालवताना वाहतूकीचे नियम पायदळी तुडवत धुगगूस घातला आहे.

यापैकी एका कारमध्ये एक जण चालत्या कारच्या बॉनेटवर बसलेला दिसून येतो. ही कार याच पद्धीतने या परिसरात फिरताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक तरूण चालत्या कारच्या टपावर चक्क उभा राहिल्याचे दिसून येते.

हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यातील पहिली कार ही महाराष्ट्र पासिंगची आहे.

काही स्थानिकांनी त्यांना सांगुनही या पर्यटकांमध्ये काहीही फरक पडला नाही. ते अशाच पद्धतीने चालले होते. दरम्यान, गोव्यातून या दोन्ही कारमधील पर्यटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अशा पद्धतीने वाहतुकीच्या नियमांचा भंग करून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबद्दल यांना शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा प्रतिक्रिया या प्रकारावरून उमटल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT