Goa Drugs Case: हडफडे येथे काल 01 फेब्रुवारी रोजी टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे 5 लाखाहून अधिक किमतीचा ड्रग्जचा साठा पोलिसांनी हस्तगत केलाय. या प्रकरणी मुंबई आणि सोलापूर येथील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुरेश अशोक काळे (वय- 37 वर्षे, रा. गायरान वस्ती, जामगाव, सोलापूर) आणि सुबान हैदर शेख (वय 45 वर्षे, रा. साईबाबा चाळ, नेहरू नगर , महाकाली चौक , मुंबई उपनगर) अशी त्या दोघांची नावे आहेत.
सुरेश यांच्याकडे पोलिसांना 35.31 ग्रॅम आणि सुबान यांच्याकडे 20.35 ग्रॅम 'हेरोइन ड्रग्स आढळून आले आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत त्या दोघांकडूनही ड्रग्सचा सर्व साठा पोलिसांनी जप्त केलाय.
या ड्रग्सची बाजार किमंत अंदाजे 5,45,000/- एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी म्हापसा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच हणजूण पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर प्रशाल देसाई यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
दोनच दिवसांपूर्वी सिकेरी आणि वास्को या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करत अवैधरित्या गांजा विक्रीप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यत घेतले होते.
विशेष म्हणजे केलेल्या आत्तापर्यंत केलेल्या कारवायातील बहुसंख्य आरोपी हे परप्रांतीय असल्याचे सिद्ध झाले आहे.
गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या परप्रांतियांकडून अशा प्रकारचे गुन्हे घडत असून या मागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.