Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: गोव्यात घातपाताचे प्रकार वाढले; मुरिडा-फातोर्डा येथे आढळला मृतदेह

Goa Crime Case: या मृतदेहाच्‍या अंगावर कुठल्‍याही प्रकारच्‍या जखमा सापडलेल्‍या नाहीत

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: मुरिडा-फाताेर्डा येथे एका शेतात गुरुवारी (ता.29) अत्‍यंत कुजलेल्‍या अवस्‍थेत एका इसमाचा मृतदेह आढळला असून हा घातपाताचा प्रकार तर नाही ना, असा संशय स्‍थानिकांनी व्‍यक्‍त केला आहे.

या मृतदेहाच्‍या अंगावर कुठल्‍याही प्रकारच्‍या जखमा सापडलेल्‍या नाहीत तरीही आम्‍ही सर्व कोनातून तपास करत आहाेत, अशी माहिती फातोर्डा पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक नाथन आल्‍मेदा यांनी दिली.

मृत व्‍यक्‍तीचे नाव शिवा लमाणी असे असून तो मूळ कर्नाटक राज्‍यातील असल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे. गुरुवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला.

काही दिवसांपूर्वी त्‍याचा मृत्‍यू झाला असावा, असा संशय असून हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्‍हा इस्‍पितळात पाठवून देण्‍यात आला आहे.

दरम्‍यान, फातोर्डा भागात मागच्‍या काही काळात असे घातपाताचे प्रकार वाढले असून या भागात एका इसमाचा खूनही झाला होता. हाही प्रकार खुनाचा आहे की नाही याचा पोलिसांनी कसून तपास करावा, अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते मिलाग्रीस फर्नांडिस यांनी केली आहे.

गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला असून दिवसेंदिवस कायदा- सुव्यवस्था राखणं हे पोलिसांसमोर मोठं आवाहन बनलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

Bicholim: बेपत्ता महिला अखेर बेळगावी येथील आश्रमात सापडली, हातुर्लीतील चंद्रिकाचा आठवडाभरापासून सुरू होता शोध

SCROLL FOR NEXT