Cuncolim IDC Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

Cuncolim IDC Crime: ‘व्यसन हे केवळ शरीराचाच नव्हे तर सुखी संसाराचाही नाश करते’, याची प्रचिती देणारी एक हृदयद्रावक घटना कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत (IDC) परिसरात घडली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कुंकळ्ळी: ‘व्यसन हे केवळ शरीराचाच नव्हे तर सुखी संसाराचाही नाश करते’, याची प्रचिती देणारी एक हृदयद्रावक घटना कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत (IDC) परिसरात घडली आहे. पत्नीने आत्महत्या केल्याचा विरह सहन न झाल्याने, अवघ्या २४ तासांत पतीनेही गळफास लावून आपले जीवन संपवले. रामू कुमार (२८) आणि सुनीता (२४) अशी या दुर्दैवी मृत दाम्पत्याची नावे आहेत. हे दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील होते आणि रोजगारासाठी गोव्यात स्थायिक झाले होते.

मद्यपानाचे व्यसन ठरले संसाराचा शत्रू

मिळालेल्या माहितीनुसार, रामू कुमार याला मद्यपानाचे मोठे व्यसन होते. मात्र, त्याची पत्नी सुनीता हिला रामूचे दारू पिणे अजिबात आवडत नसे. या विषयावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. सुनीताने अनेकदा रामूला हे व्यसन सोडवण्यासाठी विनवणी केली होती, मात्र रामूच्या सवयीत बदल झाला नाही. सोमवारी, २६ जानेवारी रोजी संध्याकाळी रामू पुन्हा एकदा मद्यप्राशन करण्यासाठी घराबाहेर पडला. पती वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने सुनीता अत्यंत निराश झाली. याच वैफल्यातून तिने पती घरी येण्यापूर्वीच राहत्या खोलीत पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

पत्नीच्या वियोगातून पतीचे टोकाचे पाऊल

जेव्हा रामू घरी परतला, तेव्हा त्याला आपली पत्नी मृतावस्थेत आढळली. सुनीताच्या या टोकाच्या पावसामुळे रामू पूर्णपणे खचून गेला. आपल्या व्यसनामुळेच पत्नीने जीव दिला, या अपराधीपणाच्या भावनेने त्याला ग्रासले होते. पत्नीच्या निधनानंतर तो प्रचंड नैराश्यात (Depression) गेला होता. अखेर, मंगळवारी रामूनेही त्याच घरात, त्याच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. एकाच घरात दोन दिवसांत दोन आत्महत्या झाल्याने संपूर्ण कुंकळ्ळी परिसरात खळबळ माजली आहे.

पोलीस तपास आणि कायदेशीर प्रक्रिया

या घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या दोन्ही घटनांची 'अनैसर्गिक मृत्यू' (Unnatural Death) म्हणून नोंद केली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, ते गोव्यात (Goa) पोहोचल्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडले जातील.

व्यसनाधीनतेचा भीषण परिणाम

कुंकळ्ळी आयडीसी परिसरात काम करणाऱ्या कामगारांमध्ये या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. व्यसनामुळे एक हसताखेळता संसार कसा उध्वस्त होऊ शकतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. केवळ २४ वर्षांची सुनीता आणि २८ वर्षांचा रामू यांच्या अकाली जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: पर्वरीतील कार्यालयाचे उद्घाटन अधुरेच! फेब्रुवारीतील 'दादांचा' नियोजित गोवा दौरा कायमचा रद्द

Chimbel Unity Mall Controversy: चिंबलचा विजय, सरकारची माघार! 32 दिवसांच्या चिवट लढ्यानंतर 'युनिटी मॉल'चा प्रकल्प रद्द

Rashi Bhavishya: पैसा खुळखुळणार! मालमत्ता ताब्यात येणार; 'या' राशींना मिळणार गोड बातमी

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

SCROLL FOR NEXT