Goa Crime: अधिकारी असल्याचे भासवून 5 लाखांची लूट! भामटा पुण्यातून जेरबंद, महाराष्ट्र-कर्नाटकातही 'कारनामे'

Goa Crime News:गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेची ५ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणारा संशयित सूरज पेंडसे याला गोवा गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली.

Dगोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेची ५ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणारा संशयित सूरज पेंडसे याला गोवा गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली. संशयितांवर महाराष्ट्र आणि कर्नाटकातही अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काणकोण येथील चेतन कोमरपंत यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. २८ मे ते १० जुलै २०२५ या कालावधीत संशयित सूरज पेंडसे याने आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. कामाचे बनावट संमती पत्र आणि अधिकृत पावत्या तयार करून त्याने तक्रारदाराकडून वेळोवेळी ५.०३ लाख रुपये डिजिटल माध्यमातून उकळल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Pune Speech
Goa Cyber Fraud
Maharashtra Family Suicide Case
WhatsApp Friend online Fraud case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com