Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बेपत्ता 3 अल्‍पवयीन मुली सापडल्‍या; पाच युवकही ताब्‍यात! कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई

पोलीसांनी त्‍यांना वैद्यकीय तपासासाठी पाठविले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime: कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत काल सकाळपासून राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा माग काढत पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाचजणांना अटक केली. ही कामगिरी पोलिसांनी मोठ्या शिताफिने पार पाडली.

या तीन तीन अल्पवयीन मुली हरवल्यानंतर त्यांच्या पालकांनी पोलिस तक्रार दाखल केली होती. त्‍यानुसार पोलिसांनी तातडीने लक्ष घालून तपास सुरू केला असता त्‍या नुवे येथे असल्याचे पोलिसांना आढळून आले. नंतर लगेच त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली व या मुलींना आपल्या ताब्यात घेतले.

यावेळी मुलींसोबत 5 युवकही पोलिसांना आढळून आले. त्‍यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देमेट्रियस फर्नांडिस (१८), कायमिक्स कुतिन्हो (१९), मर्विन कुतिन्हो (१८), डायगो फर्नांडिस (१९, सर्वजण रा. नुवे) व अझीम अहमद (२१, रा. फातोर्डा) अशी संशयितांची नावे आहेत.

मोबाईल केले होते स्‍वीच ऑफ, तरीही पोलिसांनी काढला माग-
या मुलींना संशयितांनी नुवे येथील डोंगरावर निर्जनस्‍थळी नेले होते. सर्वांनी आपला मोबाईल स्वीच ऑफ केला होता. त्‍यामुळे मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला व मागोवा घेत हे ठिकाण गाठले.

या मुलींशी अनैतिक प्रकार तर घडला नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी पोलीसांनी त्‍यांना वैद्यकीय तपासासाठी पाठविले आहे. त्‍याचा अहवाल येणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT