Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: भाटपाल-काणकोणात जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू , वर्मी मार लागल्‍याने मृत्यू झाल्याचा संशय

Goa Crime Case: मयताने केली होती जिल्‍हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: भाटपाल-काणकोण येथे जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू होण्‍याची घटना घडली. मृताचे नाव संतोष रिवणकर असे आहे.

काल रविवारी संतोष रिवणकर व रोहन नाईक यांच्यात बाचाबाची झाली. त्‍यावेळी रोहन नाईक याने संतोष रिवणकर याच्‍यावर हाताने ठोसा हाणला.

गंभीर मार लागल्‍याने तो खाली कोसळला व त्याचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे निश्‍चित कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी सांगितले. पोलिसांनी रोहन नाईक याला अटक केली आहे.

संतोष रिवणकर व सागर मोरजकर यांच्यात जमिनीसंदर्भात वाद आहे. या दोघांची पोट्टे येथे वीस कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या जमिनीत घरे आहेत.

मात्र सागर मोरजकर याला तीन क्रमांकाचा जमिनीचा प्लॉट दिला असताना त्याने प्लॉट क्रमांक पाचवर पक्के बांधकाम करण्यास सुरूवात केल्यानंतर त्याच्याविरोधात संतोष रिवणकर व भाऊ सचिन रिवणकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम रोखण्‍याचा आदेश दिला. तरीसुद्धा त्याने काम सुरूच ठेवले, अशी माहिती स्थानिक पंच सतीश पैंगीणकर यांनी दिली.

बांधकामावर पाणी मारताना काढला व्‍हिडिओ:-

रोहन नाईक हा सागर मोरजकर याचा मित्र असून बांधकामावर तोच देखरेख ठेवत होता. बांधकामावर पाणी मारताना संतोष रिवणकर याने त्याचा व्हिडिओ काढला.

तसेच याबाबत त्याने व त्याचा भाऊ सचिन या दोघांनी रोहन नाईक याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्‍यानंतर रोहन व संतोष यांच्यात बाचाबाची झाली.

प्रकरण हातघाईवर गेले. रोहनने ठोसा मारून ढकलल्यामुळे संतोषचे डोके जमिनीवर आपटले. गंभीर अवस्थेत त्‍याला प्रथम काणकोण सामाजिक इस्पितळात व नंतर जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. पण तेथे त्‍याला मृत घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

Mumbai Indians Captaincy: रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवण्याच्या बातम्या अफवाच, एमआयने कर्णधारपदाबाबत स्पष्टचं सांगितलं; समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Undeclared Assets: गोव्यातील 1200 लोकप्रतिनिधींची नावे जाहीर! मालमत्तेचे विवरणपत्र न दिल्याने लोकायुक्तांची कारवाई

Goa Waste Management: साळगावचा कचरा प्रकल्प 25 दिवस बंद! उत्तर गोव्यात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

SCROLL FOR NEXT