Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कांदोळीतील व्हिलामध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास; कळंगुट पोलिसांत तक्रार

Goa Theft: रेनफॉरेस्ट व्हिलामध्ये घुसून चोरट्याने लाखो रुपये किमतीची हिऱ्यांची बांगडी तसेच १५ हजार रुपये रोख चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: लोपीसवाडा-कांदोळी येथील उद्योगपती आरती किर्लोस्कर यांच्या रेनफॉरेस्ट व्हिलामध्ये घुसून चोरट्याने लाखो रुपये किमतीची हिऱ्यांची बांगडी तसेच १५ हजार रुपये रोख चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी नलिनी खांडेवाल (रा. दिल्ली) यांनी कळंगुट पोलिस स्थानकात लेखी तक्रार दिली आहे. तर चोरीस गेलेला मुद्देमाल हा फिर्यादींची बहीण अमिता मनसुखानी यांचा आहे.

ही चोरीची घटना २२ रोजी मध्यरात्री १२ वा.च्या सुमारास घडली. घरमालक आरती किर्लोस्कर (रा. पुणे) यांनी कुटुंब सोहळ्यासाठी आपल्या बहिणींना गोव्यातील या घरी बोलावले होते. त्यामुळे त्या सर्वजणी आपल्या कुटुंबासह, चार दिवसांसाठी १९ डिसेंबर रोजी गोव्यात आल्या होत्या.

घटनेच्या दिवशी संशयित चोर हा व्हिलाच्या एका अर्ध्या उघड्या खिडकीतून आतमध्ये शिरला. या खिडकीची कडी लागत नव्हती. त्यामुळे खिडकी व्यवस्थित बंद करता येत नव्हती. याचाच गैरफायदा घेत, चोरटा आतील खोलीत शिरला.

व्हिलाच्या तळमजल्यावरील बेडरूममध्ये तो गेला. तिथे बेडच्या बाजूलाच टेबलावर असलेल्या पर्समधील लाखो रुपये किमतीची हिऱ्याची बांगडी आणि १५ हजार रोख ठेवली होती. ती त्याने लंपास केली. फिर्यादीची बहीण अनिता मनसुखानी यांनी रात्रीचे जेवण करून आल्यावर ती पर्स लॉकरमध्ये न ठेवता तिथेच ठेवली होती.

या चोरीच्यावेळी फिर्यादी ही पहिल्या मजल्यावरून पाणी पिण्यासाठी खाली आली असता, कुणीतरी आल्याची चाहूल लागताच संशयित चोराने तिथून धूम ठोकली. मंगळवार, २३ रोजी हा चोरीचा प्रकार

लक्षात येताच फिर्यादींनी कळंगुट पोलिसांत रितसर तक्रार दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद

घरमालक किर्लोस्कर यांच्याकडून हे घर भाडेपट्टीवर ‘एआरबीएनबी’ या कंपनीस दिले आहे. या घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, काही महिन्यांपासून ते निकामी आहेत. हे कॅमेरे सुरू असते, तर संशयिताची छबी त्यात बंदिस्त होऊन पोलिसांच्या तपासात मदत झाली असती. सध्यातरी पोलिसांना चोराचा काहीच सुगावा लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रोषणाईने उजळले किनाऱ्यांचे गाव! गोव्यात नाताळचा जल्लोष; पाहा पणजीच्या 'इमॅक्युलेट'चर्चचा Video

Bicholim Theft: डिचोलीत पिग्मी कलेक्टरला लुबाडण्याचा प्रयत्न फसला, युवकांनी एकाला पकडले; एक पसार

आगोंद, पाळोळे किनाऱ्यावर बेकायदा कृत्ये, स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; नोंदणी नसलेल्या जलक्रीडा

Rohit Sharma Video: "रोहित भाई..वडा पाव खाओगे क्या?" चाहत्याच्या प्रश्नावर 'हिटमॅन'नं दिलं मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ

Goa Municipal Elections: 11 नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी रणधुमाळी! मार्च-एप्रिलमध्ये निवडणुकीचा धमाका

SCROLL FOR NEXT