Goa Crime: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सराफ दुकानात ग्राहक बनून आले अन् 25 ग्रॅम सोन्याचे कडे चोरले...

आरोपी पतीला अटक; पत्नीला पोलिसांत हजर होण्याची नोटीस

Akshay Nirmale

Goa Crime: म्हापशातील सराफ दुकानातून 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे चोरणाऱ्यास म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे कडे जप्त करण्यात आले आहे. सध्या त्याच्या पत्नीला पोलिसांत हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. हे दोघे ग्राहक म्हणून या दुकानात आले होते.

19 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एक अनोळखी दाम्पत्य ग्राहक म्हणून म्हापशाच्या म्युनिसपल मार्केटमधील नागवेकर ज्वेलर्समध्ये आले. त्यांनी इतरत्र लक्ष वेधून घेत डिस्प्ले काऊंटरमधील सोन्याचे 25 ग्रॅम वजनाचे कडे चोरले होते.

दुकान मलाक गौरेश नागवेकर यांनी याबाबत म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलिस निरीक्षक शितकांत नायक आणि पोलिस उपनिरिक्षक विराज कोरगावकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, अल्विटो डिमेलो, राजेश कांदोळकर, हर्षदा चोडणकर यांचे पथक तयार केले.

सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर ओल्ड गोवा येथे हे सोन्याचे कडे विक्री करताना संबंधित चोरट्यास पकडले गेले. निलेश विनायक नाईक असे त्याचे नाव आहे. तो सध्या खोर्ली येथे वास्तव्यास आहे.

तर तो मूळचा करंबोळी, ओल्ड गोवा येथील आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीला पोलिसांत हजर होण्याची नोटीस पाठवली आहे. निलेश नाईक याच्याकडून सोन्याचे कडे जप्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT