Crime branch seizes liquor boxes in Goa Dainik Gomantak
गोवा

Liquor Seized: गुन्हे शाखेची मोठी कारवाई! केळीनी-उसगाव येथील गोदामातून दारूचे 500 बॉक्स जप्त; 4 जणांना घेतलं ताब्यात

Crime branch seizes liquor boxes in Goa: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा धडक कारवाई करत बेकायदेशीर दारू साठवणुकीचा मोठा पर्दाफाश केला आहे.

Sameer Amunekar

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा धडक कारवाई करत बेकायदेशीर दारू साठवणुकीचा मोठा पर्दाफाश केला आहे. केळीनी-उसगाव परिसरातील एका गोदामावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५०० दारूच्या बॉक्सचा साठा जप्त केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही दारू मोठ्या प्रमाणात राज्याबाहेर तस्करीसाठी तयार ठेवण्यात आली होती का? याचा तपास सुरू आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला या ठिकाणी बेकायदेशीर दारूचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. छापा टाकला असता, गोदामाच्या आतील भागात ५०० दारूच्या बॉक्सचा साठा सापडला.

या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT