Goa Crime Branch Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Goa Crime Branch: कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हे शाखेने राज्यभरातील स्क्रॅप यार्डवर धडक तपासणी मोहीम राबविली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हे शाखेने राज्यभरातील स्क्रॅप यार्डवर धडक तपासणी मोहीम राबविली. ही कारवाई प्रामुख्याने कामगारांची ओळख पडताळणे व अवैध स्थलांतरित किंवा वैध कागदपत्रे नसलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी करण्यात आली.

मोहिमेदरम्यान स्क्रॅप यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांची ओळखपत्रे आणि वैयक्तिक माहितीची कसून पडताळणी करण्यात आली. यामध्ये महिला कामगारांसह एकूण १७२ जणांची तपासणी करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या नऊ विशेष पथकांनी राज्यभरात एकाच वेळी ही कारवाई केली. म्हापसा, कोलवाळ, पर्वरी, बेती, मडगाव, दवर्ली, डिकारपाळे, झुआरीनगर, कुठ्ठाळी यांसह विविध ठिकाणांतील एकूण ४८ स्क्रॅप यार्डची तपासणी करण्यात आली.

ही तपासणी मोहीम उद्याही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT