IPL Betting Racket Dainik Gomantak
गोवा

IPL Betting Racket: गोव्यात 'आयपीएल'वर सट्टा, 10 सट्टेबाज गजाआड, 95 मोबाईल जप्त

Goa Crime Branch IPL betting raid: इंडियन प्रिमिअर लीग सामन्यांवर बेकायदेशीरपणे सट्टेबाजी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: इंडियन प्रिमिअर लीग सामन्यांवर बेकायदेशीरपणे सट्टेबाजी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. रायबंदर आणि जुने गोवा परिसरात टाकलेल्या दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये पोलिसांनी १० जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, रायबंदर येथील ''कारेकर रेसिडेन्सी''मधील एका व्हिलामध्ये आयपीएलवर सट्टा लावला जात होता. १६ एप्रिलच्या मध्यरात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी दिग्विजय देवांगन (२९, छत्तीसगड), मनीष सुरहोता (२१, हरियाणा), समीर (२०, हरियाणा), गौतम परितूर (२८, उत्तर प्रदेश), ध्रुव चावाणी (२०, मध्य प्रदेश), कमल सिंग (२२, छत्तीसगड), भूपेंद्र सिंग पायक्रा (२०, छत्तीसगड) आणि करण चौहान (२०, उत्तर प्रदेश) या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी ४८ मोबाईल फोन, ४ लॅपटॉप, २८ सिमकार्ड, १८ डेबिट कार्ड आणि २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कदंबा पठार येथील ''गेरा रिव्हर ऑफ जॉय'' येथे दुसरा छापा टाकला.

या ठिकाणाहून लकी कश्यप (२७, जबलपूर) आणि करण आर्यन (२९, जबलपूर) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४७ मोबाईल, ४ लॅपटॉप, १ टॅब, ४९ सिमकार्ड आणि ७ पासबुक जप्त करण्यात आले. राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संशयित रेड्डी ८८८ आणि फेरप्ले यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून सट्टेबाजीचे व्यवहार सांभाळत होते.

संशयित पोलिस कोठडीत!

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३(५), आयटी ॲक्टचे कलम ६६-सी आणि जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. सर्व संशयित सध्या पोलिस कोठडीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT