Fake Call Centre In Goa Dainik Gomantak
गोवा

Fake Call Centre: अमिरेकन नागरिकांना गंडा; सांगोल्डा येथे बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

पाच संशयितांना अटक; संंशयित हे गुजरातमधील आहेत

Rajat Sawant

Gujarat Natives Duping US Citizens By Fake Call Centre At Goa: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी बार्देश तालुक्यातील सांगोल्डा येथील हॉटेलच्या पार्किंगमधून चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करीत पाच जणांना अटक केली.

अमेरिकन नागरिकांनी ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी जलद करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेले संंशयित हे गुजरातमधील आहेत.

पोलिस निरीक्षक किशोर रामणन यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोल्डा येथील एका हॉटेलच्या पार्किंग लॉटमधील तात्पुरत्या काचेच्या घरामध्ये छापा टाकला. कंपनीचा व्यवस्थापक संशयित टिळक जोशी आणि संशयित हर्ष पटेल हे बनावट कॉल सेंटर चालवत होते. दोघेही मूळचे अहमदाबादचे रहिवासी आहेत

एका ई-कॉमर्स साइटवरून विकत घेतलेल्या वस्तूंची डिलिव्हरी जलद करण्यासाठी 49 ते 99 यूएस डॉलर्स रक्कम मागत होते. असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच संशयित कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीचे अधिकृत एजंट नसल्याचे समोर आले.

छाप्यादरम्यान संशयितांकडून 30 सीपीयू, 30 कीबोर्ड, 30 मॉनिटर, 32 हेडफोन, दोन लॅपटॉप, एक मॉडेम, 1 लीज लाइन केबल, 2 राऊटर आणि 29 मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

जोशी आणि पटेल या संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून इतर तीन संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच प्रकृतीच्या कारणास्तव एका आरोपीला अटक करण्यात आलेली नाही असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT