'छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा'; महाराष्ट्रासह गोव्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजन

विहिंप व बजरंग दलातर्फे 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak

Chhatrapati Shivaji Maharaj Shaurya Jan Jagran Yatra: विश्व हिंदू परिषदेने गोवा आणि महाराष्ट्र राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जन जागरण यात्रा' काढण्याची घोषणा केली आहे.

दोन राज्यातील युवकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्टाने 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा बजरंग दलाने या यात्रेचे आयोजन केले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतभर शौर्य यात्रा काढण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

तसेच महाराष्ट्र आणि गोव्यात स्थानिक लोकांशी भावनिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हिंदू परिषदेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.

Chhatrapati Shivaji Maharaj
SIT Goa: हनी ट्रॅप प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नियुक्ती

“हिंदू समाजाच्या शौर्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही शौर्य जन जागरण यात्रा काढण्याचे ठरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष असल्याने त्यांचे नाव यात्रेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणातील यात्रा 30 सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू होऊन 15 ऑक्टोबरला मुंबईत संपेल असे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी सांगितले.

हिंदू समाज शूर आणि धाडसी आहे. हिंदूंनी पूर्वी कट्टरतावादी विदेशी हल्ल्यांविरुद्ध लढा दिला. हिंदूंच्या शौर्याला पुन्हा जागृत करण्यासाठी आम्ही ही यात्रा काढण्याचे ठरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिहादी प्रवृत्तींविरुद्ध लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे त्यांचे नाव आम्ही यात्रेला दिले आहे" असे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com