Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: राज्यभरात आतापर्यंत '53' बांगलादेशींची नोंद; तर 49 जण नजरकैदेत!

Goa Crime News: चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर बेकायदेशीररित्या वास्तव्य करून असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू झाली. आतापर्यंत राज्यात 53 बांगलादेशींचा शोध घेण्यात आला असून 4 जणांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. उर्वरितांना 49 जणांना त्यांच्या राहत्या घरी निर्बंध घालून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात जुने गोवे पोलिसांनी करमळी येथे राहत असलेल्या बांगलादेशींना प्रतिबंधात्मक अटक करून त्याची माहिती विदेश क्षेत्रीय नोंदणी विभागाला (एफआरआरओ) दिली आहे. प्रतिबंधात्मक अटक करून त्यांच्याच घरात नजरकैद करण्यात आलेल्यांचा दस्तावेज तपासणीसाठी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे.

या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर असलेली कुटुंबे पीएफआयशी संबंधित आहे का याचीही चौकशी करण्यात येत आहे. सध्या त्यांच्या हालचालीवर तसेच ते कामाला असलेल्या ठिकाणी अधूनमधून चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती एफआरआरओ अधिकाऱ्यांनी दिली.

म्‍हणून बांगलादेशींना ओळखणे कठीण!

बांगलादेशींचे मुस्लिम बांधवाप्रमाणेच राहणीमान असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण बनत आहेत. ज्या ठिकाणी मुस्लिमांची वस्ती अधिक आहे, तेथे पोलिस खबऱ्यांमार्फत माहिती मिळवण्याचा प्रयत्न गोवा पोलिसांकडून केला जात आहे.

बांगलादेशींचा शोध घेण्याची मोहीम सुरूच आहे. मात्र, ताब्यात घेऊन कारवाई केलेल्यांच्या दस्तावेजांची माहिती तपासून पाहण्यासाठी वेळ लागत असल्याने त्यांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया रखडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT