Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: प्रणव फडते प्राणघातक हल्ला प्रकरण! दोघे अटकेत; म्हापसा पोलिसांची कारवाई

Goa Crime News: हल्‍ल्‍यानंतर मागील पाच दिवस संशयित फरार होते.

Ganeshprasad Gogate

Goa Crime News: गोळजुवे, खोर्जुवे-हळदोणा येथे प्रणव फडते (23) याच्यावर झालेल्‍या प्राणघातक हल्लाप्रकरणातील दोघा संशयितांना म्हापसा पोलिसांनी आज सोमवारी अटक केली.

दिगंत नाईक (24, पिलार-तिसवाडी) व उस्मान खान (29, आगशी-तिसवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.

सदर घटना दि. 14 फेब्रुवारी रात्री उशिरा घडली होती. संशयित हे कारमधून (जीए 07 के 5363) आले होते. त्यातील एकाने प्रवण याच्यावर सुरीने हल्ला केला.

तो वार अडविण्यासाठी प्रवणने आपले हात पुढे केले असता, त्याच्या दोन्ही हातांना घाव लागून तो गंभीर जखमी झाला. हल्‍ल्‍यानंतर मागील पाच दिवस संशयित फरार होते.

संशयितांना पकडण्यात पोलिस उपनिरीक्षक बाबलो परब, विराज कोरगावकर, यशवंत मांद्रेकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, सिद्ध कांबळी, विनय हिरोजी, प्रकाश पोळेकर, राजेश कांदोळकर, नितेश नाईक यांनी कामगिरी पार पाडली.

म्हापसा पोलिसांनी संशयितांविरोधात भादंसंच्या कलम 326, 504 (2) व 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT