Goa Crime
Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात 10 महिन्यात तब्बल 27 बलात्कार, 21 खून; अपहरणाच्या 22 घटना

Akshay Nirmale

Goa Crime: गोव्यात या वर्षात म्हणजेच सन 2023 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांच्या काळात तब्बल 940 गुन्ह्यांची पोलिसांकडे नोंद झाली आहे. तर यापैकी सुमारे 813 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, या दहा महिन्यात राज्यात बलात्काराच्या 27 तर खूनाच्या 21 घटना घडल्या आहेत. पोलिस दल गुन्हे उकलण्यात तत्पर असून राज्यातील गुन्हे उकलण्याचा दर 86.48 टक्के इतका आहे. पोलिस दलाकडूनही माहिती देण्यात आली आहे.

1 जानेवारी ते 31ऑक्टोबर या काळात एकूण 21 खून झाले आहेत. तर 6 खूनाच्या प्रयत्नांचे गुन्हे नोंद आहेत. 21 खूनांपैकी 19 घटनांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे तर अद्याप तीन घटनांमध्ये आरोपी सापडलेला नाही.

एकूण 27 बलात्काराच्या घटना या काळात नोंद झाल्या आहेत. गुन्ह्यांच्या घटनांमध्ये 33 दरोड्यांच्या घटना आहेत. त्यापैकी 8 दरोडे हे दिवसाढवळ्या पडलेले आहेत तर उर्वरीत 25 दरोड्याच्या घटना रात्रीच्या वेळच्या आहेत.

20 घरांमध्ये घरफोडी, मोटरसायकलवरून 44 चोरींचे प्रकार, त्यात 9 सोन साखळीच्या चोरीचे गुन्हे नोंद झाले आहेत. एकूण चोरीच्या 175 घटना असून यात 69 मोबाईल फोन चोरीच्या घटना आहेत तर उर्वरीत किरकोळ चोरींच्या घटना नोंद आहेत.

175 पैकी 120 चोऱ्यांमध्ये दोषी सापडला आहे. दरोड्याच्या घटनांमध्ये 68.57 टक्के केसेस सोडविण्यात पोलिस दलाला यश आले आहे.

या दहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी 50 फसवणुकीचे गुन्हे नोंदवले आहेत. त्यातील 25 गुन्ह्यांमध्ये तपास पूर्ण झाला आहे. भांडणांच्या 76 घटना घडल्या आहेत. त्यातील 71 मध्ये तपास पूर्ण झाला आहे.

अपहरणाच्या 22 घटना घडल्या आहेत. यातील 20 घटनांचा पोलिस तपास पूर्ण झाला आहे. दरम्यान, 279 केसेस IPC अंतर्गत नोंदवले गेल्या आहेत. त्यातील 272 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात गुन्हेगारी दरात जवळपास 28 टक्के घट झाली आहे. ही आतापर्यंतची मोठी घट आहे. गेल्या वर्षी एकूण IPC अंतर्गत 940 तर या वर्षी 681 प्रकरणे नोंद आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत खुनांच्या घटनांमध्ये 12 ने घट झाली आहे. तर बलात्काराच्या घटनांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तथापि, बलात्काराच्या सर्व प्रकरणांमध्ये आरोपी आणि पीडित दोघेही एकमेकांना ओळखतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: गोव्याच्या विनाशावर भाजपचे मौन; युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT