South Goa Congress president Savio D'Silva in the center while speaking at the press conference Gomantak Digital Team
गोवा

गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे - सावियो डिसिल्वा

सावियो डिसिल्वा : जुवारीनगर गोळीबारानंतर कॉंग्रेसचा सरकारवर घणाघात

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : राज्यात गुन्हेगांराना कायद्याची कसलीही भीती राहिलेली नाही. त्यामुळेच दिवसा ढवळ्या चोऱ्या व दरोड्यांसारख्या घटना घडतात. गोव्यात महिला सुरक्षित नाहीतच , आता जो लोकांचे रक्षणकर्ते ते पोलिसही सुरक्षित राहिलेले नाहीत.

याचाच अर्थ असा की, गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, अशी सरकारवर घणाघाती टीका आज दक्षिण गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. मडगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डिसिल्वा म्हणाले, काही महिन्यांपूर्वी  घडलेल्या सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास लागलेला नाही. असे  असताना काल राय येथे दिवसा ढवळ्या तीन गुन्हेगारांनी एका महिलेच्या हातातील बांगड्या हिसकावून घेऊन पळ काढला. तिच्या मदतीला कोणीही आले नाही. 

झुवारीनगर  येथे चोरांनीच पोलिसांवर गोळीबार केला. त्यात एक पोलिस जखमी झाला. झुवारीनगर  येथे घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढण्याचे व कमी वजनाचे गॅस सिलिंडर ग्राहकांना देण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी,  अशी मागणी यावेळी वेगवेगळी उदाहरणे देऊन सावियो डिसिल्वा यांच्यासह  पदाधिकारी मोरेनो रिबेलो, ओलेंसियो सिमोईश, पीटर डिसोझा यांनी केली. 

ज्या प्रकारे गोव्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासन ढिले पडले आहे, ते पाहता पर्यटकांसमोर चुकीचे उदाहरण ठेवले जात आहे, असे ओलांसियो सिमोईश यांनी म्हटले. सर्व नागरीकांनी एकजूट दाखविण्याची ही वेळ आहे. सर्वांनी घराबाहेर पडून अन्याय व गुन्हेगारीविरुद्ध आंदोलन छेडणे आवश्यक आहे,असे सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.

शस्त्रास्त्रे येतात कुठून; चौकशी व्हावी !

गोव्यात व खास करून मुरगाव तालुक्यात अवैध धंदे, भांडणे, चोऱ्या आदी प्रकारांना ऊत आला आहे, असे ओलेंसियो सिमोईस व पीटर डिसोझा यांनी सांगितले. या तालुक्यातील प्रशासन एकदम ढासळलेले आहे. पोलिस गुन्हेगार व समाजकंटकांना पकडण्याऐवजी पोलिस सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवून आहेत, असे त्यांनी सांगितले. मुरगाव तालुक्यात शस्त्रात्रे कुठून येतात व कुठे जातात, याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमावी,असेही पीटर डिसोझा यांनी सांगितले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: युवा शक्ती आणि उत्साहाचा संचार; 'या' राशींना मिळणार नोकरीत बढती, वाचा राशी भविष्य!

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

SCROLL FOR NEXT