Fake WhatsApp Accounts 
गोवा

Goa Cyber Crime: राज्यात बनावट ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा सुळसुळाट, मंत्री, आमदारांनंतर आता पत्रकार निशाण्यावर; पोलिसांना तपासात अपयश

Fake WhatsApp Accounts: राज्यातील काही मंत्री व आमदारांच्या नावे बनावट व्हॉट्स अॅप खाती तयार करून त्‍याद्वारे अज्ञातांनी पैशांची मागणी करणारे मेसेजीस पाठवल्याच्या तक्रारींना महिना उलटून गेला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील काही मंत्री व आमदारांच्या नावे बनावट व्हॉट्स अॅप खाती तयार करून त्‍याद्वारे अज्ञातांनी पैशांची मागणी करणारे मेसेजीस पाठवल्याच्या तक्रारींना महिना उलटून गेला. त्यांचा तपास लावण्यात सायबर क्राईम विभागाला यश आलेले नाही. आता पत्रकारांच्‍या नावे बनावट व्‍हॉट्सॲप खाती काढली असल्‍याचे उघड झाले आहे.

अज्ञातांकडून असे प्रकार सुरूच असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरून हे मेसेज पाठवले आहेत, त्यातील अनेक मोबाईल बंद झाले आहेत; तर काही क्रमांकांपर्यंत संपर्क साधणे शक्य होत नाही, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अशा खोट्या अकाऊंटचा वापर खोडसाळ, चुकीची वृत्ते पसरवण्यासाठी किंवा हॅकिंगचा प्रयत्न करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे असे बनावट व्हॉट्सअप (WhatsApp) अकाऊंटवरून येणाऱ्या मेसेजीसपासून लोकांनी सावध राहावे, असे आवाहन सायबर क्राईम पोलिसांनी केले आहे.

...तर साधे पोलिस छडा लावतील?

एका पत्रकाराच्‍या नावे १४ एप्रिल रोजी ९८२७३५२२४४ ह्या क्रमांकाद्वारे व्‍हॉट्स ॲपवरून अनेकांना पैशांची मागणी करण्‍यात आली होती. त्‍या संदर्भात सायबर पोलिसांत तक्रार केली असता - ‘ही तक्रार आमच्‍या अखत्‍यारीत येत नसून, नजीकच्‍या पोलिस ठाण्‍यात नोंदवा’, असे लेखी उत्तर देण्‍यात आले होते. सायबर क्राईम अशा प्रकारांच्‍या तपासाला बांधिल नसल्‍यास साधे पोलिस छडा लावू शकतील का, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे.

काही अनुत्तरित प्रश्‍‍न

प्रसिद्ध व्‍यक्‍तींनाचा हेरून त्‍यांच्‍या नावे बनावट व्‍हॉट्स ॲप क्रमांक ॲक्‍टिव कुठून होतात?

अशा व्‍यक्‍तींच्‍या संपर्कातील माणसे ठकबाजांना कशी कळतात?

खऱ्या व्‍हॉट्स ॲपवरील संपर्क क्रमांक हे हॅक होतात का? पोलिस यंत्रणा याचा कधी शोध घेणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT