Vasco Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बेकायदेशीर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाला अटक; वास्को पोलिसांची कारवाई

Goa Police: राज्यात गेल्या काही दिवसांत गोवा पोलिसांच्या बेकायदेशीर अमली पदार्थविरोधातील कारवाया वाढल्या आहेत.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत गोवा पोलिसांच्या बेकायदेशीर अमली पदार्थविरोधातील कारवाया वाढल्या आहेत. यातच, रविवारी (12 जानेवारी) वास्को पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाला बेकायदेशीर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. यावेळी त्याच्याकडून 1 किलो गांजा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित पोलिस गस्तीदरम्यान रविवारी सकाळी 9.15 वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीची ओळख पटवण्यात आली असून तो वास्को येथील रहिवासी आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत तब्बल 1 लाख रुपये आहे.

दरम्यान, आरोपीवर (Accused) नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या कलम 20 (अ)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला रविवारी सकाळी 10:50 वाजता औपचारिकरित्या अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय प्रिस्ली कार्व्हालो यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. आरोपीचा मोठ्या अमली पदार्थ नेटवर्कशी काही संबंध आहे का हे शोधण्याचे पोलिस सध्या काम करत आहेत.

पर्यटन हंगाम

राज्यात सध्या पर्यटन हंगाम (Tourist Season) सुरु आहे. देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात पोहोचले आहे. याचदरम्यान, बेकायदेशीर अमली पदार्थाच्या तस्करीच्या सातत्याने घटना समोर येतायेत. तर दुसरीकडे, पोलिसही तात्काळ अशा घटनांसंबंधी कारवाया करताना दिसातेयत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT