German National Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 24 लाखांच्या ड्रग्जसह जर्मनीमधील माणसाला अटक; तस्करीचे मोठे जाळे हाती लागण्याची शक्यता

Mapusa Police Drug Bust: ४५ वर्षीय जर्मन नागरिकाला गोव्यातील अंमली पदार्थ विरोधी सेलने विविध प्रकारचे अवैध ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.

Akshata Chhatre

व्हागतोर : ४५ वर्षीय जर्मन नागरिकाला गोव्यातील अंमली पदार्थ विरोधी सेलने विविध प्रकारचे अवैध ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. सेबॅस्टियन हेस्लर असे आरोपीचे नाव असून सोमवारी (३ फेब्रुवारी) रोजी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात तो पोलिसांच्या हाती सापडला.

अमलीपदार्थ विरोधी सेलने व्हागतोर येथे छापा टाकला होता जिथे भाड्याने घेतलेल्या जागेवर जर्मनी येथील सेबॅस्टियन हेस्लर (४५) याला २४ लाख रुपयांच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. या छाप्यात पोलिसांनी एलएसडी ब्लॉट पेपर्स, केटामाइन पावडर, केटामाइन लिक्विड आणि २ किलो गांजा यांचा मोठा साठा जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना या घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात टाकलेल्या छाप्यात त्यांच्या हाती काही अमलीपदार्थ लागले होते आणि यावेळी टाकलेला छापा हा त्याच प्रकरणाचं फॉलोअप ऑपरेशन आहे.

पूर्वी गोव्यात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील अंबीव सेनगुप्ता याला १६ ग्रॅम एमडीएमए आणि ५० ग्रॅमपेक्षा जास्त उच्च दर्जाचे कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा म्हणालेत कि या दोन्ही छाप्यांमध्ये पोलिसांच्या हाती ३२-३३ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्स लागले आहेत. हेस्लर आणि सेनगुप्ता यांच्या अटकेनंतर गोव्यात सुरु असलेल्या अमलीपदार्थांच्या तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अधिकारी काम करत असून तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT