Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फोंड्यात 15 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; परप्रांतीय तरूणाला अटक

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा

Akshay Nirmale

Goa Crime: फोंडा येथील शाळेत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर शाळेच्या वेळेत मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या 23 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. पप्पू सिंग असे त्याचे नाव आहे.

संबंधित अल्पवयीन मुलगी शाळेतून बेपत्ता झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. स्कूलबसमधून ही मुलगी शाळेत जाते. पण दिवसभर ही मुलगी शाळेत नव्हती. त्यामुळे शिक्षकांनी या मुलीच्या पालकांशी संपर्क साधून मुलगी शाळेल नसल्याची माहिती दिली.

दरम्यान, स्कूलबसमधील इतर विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना कळाले की, संबंधित मुलगी सकाळी स्कूलबसून आली होती. परंतू ती शाळेच्या आवारात आली नाही. ही माहिती शिक्षकांनी पालकांना कळवली. त्यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेत मुलीचा शोध सुरू केला.

त्यानंतर ही मुलगी शाळेजवळ आढळून आली. तेव्हा तिला पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये आणले. तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. तेव्हा पप्पू सिंग याने तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले.

पप्पू सिंगने तिला पळवून सध्या तो स्वतः राहत असलेल्या परिसरातील भाड्याच्या खोलीत नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी पप्पू सिंग याला ताब्यात घेतले आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT