Cricketer Saurabh Bandekar in 'AAP' Dainik Gomantak
गोवा

क्रिकेटपटू सौरभ बांदेकरचा ‘आप’मध्ये प्रवेश

सौरभ (Saurabh Bandekar) हा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू तसेच माजी रणजीपटू असून 2009 ते 11 या काळात आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स (RCB) बंगलोरचे प्रतिनिधित्व केले.

Dainik Gomantak

Goa: गोव्‍याचा माजी रणजीपटू सौरभ बांदेकर (Saurabh Bandekar) याने 'आम आदमी पार्टी'त (AAP) प्रवेश केला. पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे (AAP Convenor Rahul Mhambre) यांनी त्‍याचे पक्षात स्‍वागत केले.

सौरभ हा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, माजी रणजीपटू आहे. गोव्याचे त्‍याने प्रतिनिधित्व केले आहे. 2009 ते 11 या काळात त्‍याने आयपीएलमध्ये (IPL 2009 - 11) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे (RCB) प्रतिनिधित्व केले. 2005-06दरम्यान दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, झिंबाब्‍वे आणि श्रीलंका या संघांचा समावेश असलेल्या आफ्रो-आशियाई स्पर्धेत तो खेळला आहे.

केजरीवाल सरकारने दिल्लीत केलेल्या कामामुळे मी प्रभावित झालोय. गोव्‍यालाही असे प्रामाणिक सरकार भविष्‍यात मिळेल. या सरकारची काम करण्‍याची तडफ वेगळीच आहे. त्‍यामुळेच प्रभावीत होऊन मी ‘आप’मध्‍ये प्रवेश केला.

- सौरव बांदेकर, गोव्‍याचा माजी रणजीपटू

गोव्‍यात आम आदमी पक्षाचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. गोमंतकीय जनतेला ‘आप’बद्दल विश्‍‍वास वाटू लागला आहे. त्‍यामुळेच भाजपचे अनेक नेते केजरीवाल यांच्या मॉडेलने प्रभावित होऊन ‘आप’मध्ये सामील होत आहेत.

- राहुल म्हांबरे, ‘आप’चे राज्य संयोजक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT