Pundalik Naik lead Goa team in Cooch Behar trophy: Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket: कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत पुंडलिक नाईक करणार गोवा संघाचे नेतृत्व

अंडर-19 पुरुष संघ : 17 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत मुंबईत होणार स्पर्धा

Akshay Nirmale

Pundalik Naik lead Goa team in Cooch Behar trophy: आगामी अंडर-19 पुरुष कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पुंडलिक नाईक गोव्याच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. तर यश कासवणकर यांची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय) तर्फे 17 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत मुंबई येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत गोव्याची पहिली लढत 17 नोव्हेंबर रोजी मुंबईविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी गोव्याचा सामना चंदीगड संघाशी होईल. 1 नोव्हेंबरला गोवा संघ त्रिपुरा संघाशी आणि एका आठवड्यानंतर पंजाब संघाशी लढेल.

15 नोव्हेंबर रोजी विदर्भाविरुद्धच्या सामन्यानंतर गोव्याच्या साखळी सामन्यांची सांगता होईल.

असा आहे संघ:

पुंडलिक नाईक (कर्णधार), शंतनू नेवगी, वीर यादव, निसर्ग नागवेकर, यश कासवणकर (विकेट कीपर), दिशांक मिस्कीन, जीवन चित्तेन (विकेटकीपर), युवराज सिंग , स्वप्नील गावकर,

कौस्तुभ पिंगुळकर, रुद्रेश शर्मा, दर्शन महेंद्रकर, शिवेन बोरकर, दर्पण पागुई, विराज अमित नाईक, मोहम्मद रेहान आणि निश्चय नाईक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: महाराष्ट्रीयन ३.५० लाख देऊन बनतात पोस्टमन!

Chapoli Dam: 'चापोली' ओव्हरफ्लो! मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Goa Assembly Session: "स्वातंत्र्यसैनिक‍ांच्या मुलांना माझ्या काळात सर्वाधिक सरकारी नोकर्‍या!" मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत आकडेवारी सादर

Most Sixes in WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 'सिक्सर किंग कोण? टॉप-5 मध्ये भारतीयांची एकछत्री सत्ता! पाहा यादी

Goa Opinion: मूळ गोमंतकीय हद्दपार होईल, अल्पसंख्य होईल, अशी विकासाची व्याख्या कुणाला हवीय? कोळसा हाताळणीचे वास्तव

SCROLL FOR NEXT