Corona In Goa Dainik Gomantak
गोवा

Corona In Goa: कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, वास्‍कोत सापडला नवीन कोविड रुग्‍ण, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 257 वर

Corona Virus News: महाराष्‍ट्र, तामिळनाडू आणि केरळ या जवळच्‍या तीन राज्‍यांत कोरोनाचे नवीन रुग्‍ण सापडू लागले असतानाच गोव्‍यात वास्‍को येथे एक ७० वर्षीय नागरिक पॉझिटिव्‍ह आढळला आहे.

Sameer Amunekar

मडगाव : महाराष्‍ट्र, तामिळनाडू आणि केरळ या जवळच्‍या तीन राज्‍यांत कोरोनाचे नवीन रुग्‍ण सापडू लागले असतानाच गोव्‍यात वास्‍को येथे एक ७० वर्षीय नागरिक पॉझिटिव्‍ह आढळला आहे. त्‍याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्‍यात आले आहे.

सध्‍या देशात कोरोनाचे २५७ सक्रिय रुग्‍ण आहेत. दरम्‍यान, गोव्‍यात नवीन रुग्‍ण सापडला म्‍हणून कुणीही घाबरून जाऊ नये. राज्‍यातील जवळपास सर्व नागरिकांनी कोविडची लस टोचून घेतली आहे. त्‍यामुळे लोकांमध्‍ये कोविड प्रतिबंधक क्षमता निर्माण झाली असून साथ पसरणार अशी भीती कुणी बाळगू नये, असे आवाहन साथीच्‍या रोगांचे विभाग प्रमुख डॉ. उत्‍कर्ष बेतोडकर यांनी केले आहे.

केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला.

तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर दीर्घकालीन आजारांमुळे झाला. एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता आणि दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम, मूत्रपिंडाशी संबंधित आजार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT