पणजी: राज्यात आज रविवारी 939 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 94 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 76 जण कोरोनामुक्त झालेत. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 911 इतकी झाली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे कोनाचाही बळी गेला नसल्याने बळींचा आकडा 3955 कायम आहे.
राज्यात आतापर्यंत 2,53,042 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2,48,176 लोक पूर्णपणे बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे.
Vishwajit Rane: गावच्या विकासात सर्वांनी एकत्र यावे
भिरोंडा पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी आपले वेगळे सबंध आहेत. भिरोंडा वासियांना येणाऱ्या काळात काहीच कमी पडू देणार नाही, या भागातील युवा व महिला वर्गाच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. असे आश्वासन मंत्री विश्वजित राणे यांनी दिले.
या पंचायत क्षेत्रांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊन येणाऱ्या काळात येथे प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावली जाणार आहेत. त्यासाठी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपण सत्तरीच्या विकासासाठी विविध योजना अमलात आणत असून लवकरत आपण जनतेला दिलेल्या आश्वसनाची पुर्तता करणार आहोत. यासाठी आपल्याबरोबर आमदार डाॅ. दिव्या राणे सदैव असे ही ते यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.