Goa Covid-19: government's focus on elections, number of corona patients increased in state Dainik Gomantak
गोवा

Goa सरकारचे लक्ष निवडणुकीकडे, कोरोना रुग्णांची संख्या हजाराकडे!

गोवा राज्यात पुन्हा एकदा सक्रिय कोरोनाबाधितांची संख्यावाढत आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारने कोविड एसओपीमध्ये सवलत दिल्यापासून गेल्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारला एसओपीमध्ये दिलेल्या ढिलाईबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यात कोरोना नियंत्रणाची परीरिस्थिती असतानासुद्धा, गुरूवारी राज्यात एकही बळी नोंदवला गेला नाही, मात्र कोरोनाबाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत 976 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत होते. मात्र काल या रूग्णसंख्येने हजाराचा आकडा गाठला. राज्य सरकारने जवळपास सर्वच गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही गोव्यात झपाट्याने वाढत आहे. आणि नियमांचे सर्रास उल्लंघनही होताना दिसत आहे.

करोनाचे संकट अजूनही असतानाच गोवा राज्य सरकारने सगळे नियम शिथिल केले आहेत, याचाच परिणाम म्हणून करोनाचा आकडा वाढत नाही ना? याचा कुठंतरी सरकारने विचार करायला हवा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतत होणाऱ्या बैठका, सभा, संमेलन या सर्व गोष्टीमध्ये व्यस्त असलेल्या सरकारचे करोनाच्या वाढत्या अकड्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे.

गोव्यात सर्व काही खुले झाल्याचे कळताच देशी पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी गोव्यात दाखल होत आहेत. मोठ्या प्रमाणात गोव्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची तपासणी नाक्यावर तपासणी करणे शक्य होत नसल्याचेही कळते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आजच्या दिवशी ती 976 झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी ही संख्या 700 होती. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत 6014 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

SCROLL FOR NEXT