Goa Corona Update: राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा वाढता आलेख

24 तासांत 102 नवे रुग्ण आढळून आले असून; गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.
24 तासांत 102 नवे रुग्ण आढळून आले असून; गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.
24 तासांत 102 नवे रुग्ण आढळून आले असून; गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात कोरोना (Corona) नियंत्रणाची परीरिस्थिती असतानाच, बुधवारी राज्यात एकही बळी नोंदवला गेला नाही, मात्र कोरोनाबाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. 24 तासांत 102 नवे रुग्ण (patients) आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. राज्य सरकारने जवळपास सर्वच गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नियमांची सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.

24 तासांत 102 नवे रुग्ण आढळून आले असून; गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.
मायकल लोबोंच्या थयथयाटानंतर थेट अभियंत्याची बदली

करोनाचे संकट अजूनही असतानाच गोवा राज्य सरकारने सगळे नियम शिथिल केले आहेत, याचाच परिणाम म्हणून करोनाचा आकडा वाढत नाही ना? याचा कुठंतरी सरकारने विचार करायला हवा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतत होणाऱ्या बैठका, सभा, संमेलन या सर्व गोष्टीमध्ये व्यस्त असलेल्या सरकारचे करोनाच्या वाढत्या अकड्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे.

24 तासांत 102 नवे रुग्ण आढळून आले असून; गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.
Goa: ‘आप’ सत्तेवर येणारच नाही; दामोदर नाईक

राज्यातील करोना बंधितांची संख्या

  • राज्यात गेल्या 24 तासांत 102 नवे रुग्ण

  • बुधवारी एकूण 5,945 कोरोना चाचण्या करण्यात आल्या

  • बुधवारी एकूण 38 कोरोना बाधीत हे बरे झाले.

  • राज्यात एकूण 950 सक्रिय रुग्ण आहेत

राज्यात एकूण लसीकरण

  • राज्यात आतापर्यंत एकूण 17,87,022 एवढे लसीकरण झाले

  • एकूण 11,86,427 लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला

  • एकूण 6,00,595 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com