Goa Covid-19  Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: पुन्हा कोरोनाचा शिरकाव; या भागात लागला मायक्रो कंटेनमेंट झोन

गोव्यात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3191 वर पोहचली आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा (Ponda) तालुक्यात तब्बल पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा मायक्रो कंटेनमेंट झोन (Micro Containment Zone) जाहीर करण्याची पाळी सरकारवर (Goa Goverment) आली आहे. बोरी पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मधील देऊळवाडा भागात एकाच कुटुंबातील 9 जण कोरोनाबाधित (Goa Covid-19) सापडल्‍याने हा परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. यासंबंधीचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी (South Goa District Collector) काढला असून त्याच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून आवश्‍यक सहकार्य करण्याची सूचना केली आहे.

राज्यात गुरुवारी चार बळी; 92 नवे रुग्ण

राज्यात आज कोरोनामुळे चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3191 वर पोहचली आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 5409 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून 92 नवे कोरोनाबाधित आढळून आले. 71 जण बरे झाले. आजच्या दिवशी सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 950 आहे. कोरोनातून बरे होण्याऱ्यांची टक्केवारी 97.61 एवढी आहे.

बोरी पंचायतीच्या देऊळवाडा भागात एकाच कुटुंबात नऊजण कोरोनाबाधित सापडले आहेत. शिरोडा आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती फोंड्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर हा परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार सर्वेक्षण करून जिल्हाधिकारी संजीत रॉड्रिक्स यांनी आदेश काढला.

पाच महिन्यांपूर्वी ढवळीत, आता बोरीत!

पाच महिन्यांपूर्वी ढवळी येथील महिला आश्रमात एकाचवेळी अठरा कोविडबाधित सापडल्याने हा परिसर गेल्या 21 मार्चला मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला होता. आता बोरीतील देऊळवाडा परिसरात रुग्‍ण सापडले आहेत. राज्यात रोज किमान शंभर बाधित सापडत असून फोंडा तालुक्यात सध्या 111 सक्रीय रुग्ण आहेत.

5 जणांनी घेतले होते दोन्‍ही डोस

बोरीत एकाच कुटुंबातील जे 9 जण कोरोनाबाधित सापडले आहेत, त्‍यात 5 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पाचही पुरुषांनी कोरोनाप्रतिबंधक दोन्ही डोस घेतले होते तर चारही महिलांनी एक डोस घेतला होता. डोस घेऊनही हे कुटुंब कोरोनाबाधित सापडल्‍याने खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

SCROLL FOR NEXT