Goa NCP-AAP: चर्चिल यांच्या मुलावर मारहाणीचा आरोप

परस्‍पर‍विरोधी तक्रारी; पोस्टर लावण्यावरून दोन्‍ही गटांत धक्काबुक्की
 Churchill-AAp dispute escalated
Churchill-AAp dispute escalatedDainik Gomantak

पणजी: गोव्यात (Goa) रात्री उशिरा आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांचा मुलगा सावियो आणि पुतण्या वॉरेन आलेमाव यांनी बाणावलीमध्ये (Benaulim) ‘आप’चे (AAP) स्वयंसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्य हँझेल फर्नांडिस यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

फर्नांडिस हे कार्यकर्त्यांसह बाणावलीत शिक्षण विषयावरील चर्चेची घोषणा करणारे बॅनर लावत होते. त्यासाठी ‘आप’चे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगस यांनी आलेमाव यांना आव्हान दिले होते. याबाबत फर्नांडिस म्हणाले, सावियो आणि वॉरेनने आम्हाला अडवून कार्यकत्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हल्ला केला. गुंडगिरीचे हे राजकारण थांबविण्याची वेळ आली आहे.

 Churchill-AAp dispute escalated
Goa वीज खात्याचा अजब-गजब कारभार

आपचे कार्यकर्ते विएगास आणि प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले की, "आपचे स्वयंसेवक बाणावली येथे रस्त्याच्या कडेला बॅनर लावत होते जेव्हा चर्चिल यांचा मुलगा सावियो आणि पुतण्या वॉरेन यांनी आम आदमी पार्टीचे झेडपी सदस्य हँझेल फर्नांडिस आणि इतर कार्यकर्त्यांसोबत हातापायी केली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याच्या कारणावरून आप स्वयंसेवकांनी लावलेल्या बॅनरवर आक्षेप घेतला. यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांच्या समर्थकांमध्ये भांडण झाले. फर्नांडिस यांनी सांगितले की त्याच्या आणि त्याच्या सह स्वयंसेवकानसोबत हातापायी करण्यात आली आणि गंभीर परिणामांची धमकीही देण्यात आली."

 Churchill-AAp dispute escalated
गोव्यात पहिले Online CNG स्टेशन सुरू

दरम्यान सॅवियो आणि वॉरेन यांनी उलट दावा करत आपच्या स्वयंसेवकानी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना आपवर सार्वजनिक वादविवादासारख्या मुद्द्यावर वाद निर्माण केल्याचा आरोप केला. “माझ्या परवानगीशिवाय आमचा फोटो त्यांच्या बॅनरवर लावण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यामुळे काल रात्री जेव्हा त्यांची विचारपूस करण्यात आली तेव्हा हा उडाला. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांना निष्पक्ष चौकशी आणि तपास करू द्या, ” असे आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com