Vikat Bhagat Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Case: विकट जर डॅनियलीशी लग्‍न करणार होता तर निर्जनस्‍थळी एकटीला का टाकून गेला? कोर्टाचा संतप्त सवाल

Goa Court: विकटचे डॅनियलीवर खरेच प्रेम होते आणि तिच्‍याशी तो लग्‍न करणार होता, तर त्‍या रात्री तो डॅनियलीला ती अत्‍यवस्थ स्‍थितीत असताना एकटीलाच का सोडून गेला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Court Questions Vikat Bhagat’s Love Claim in Danielle MacLaughlin Murder Case

मडगाव: ब्रिटीश व आयरीश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन हिचा खून आपण केलाच नाही. वास्‍तविक २०१४ पासून आम्‍ही दाेघे एकमेकांच्‍या प्रेमात पडलो होतो. मी डॅनियलीशी लग्‍न करणार होतो. अशा परिस्‍थितीत मी तिचा खून करणारच का? या खून प्रकरणातील संशयित विकट भगत याने आपल्‍या बचावार्थ मुद्दा उपस्‍थित केला होता. मात्र, विकटचे डॅनियलीवर खरेच प्रेम होते आणि तिच्‍याशी तो लग्‍न करणार होता, तर त्‍या रात्री तो डॅनियलीला ती अत्‍यवस्थ स्‍थितीत असताना एकटीलाच का सोडून गेला. अन्‍य कुणी प्रेमी असता तर तो आपल्‍या प्रेयसीला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला नसता का? असा सवाल न्‍यायालयाने केला.

डॅनियली मॅकलॉग्लीन बलात्‍कार व खून प्रकरणी दक्षिण गोव्‍याचे (South Goa) अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जाेशी यांनी विकट भगत याला दोषी ठरविताना दुहेरी जन्‍मठेपेची शिक्षा फर्मावली. यासंबंधी ३५० पानांचा निवाडा त्‍यांनी दिला असून त्‍यात आलेला महत्त्वाचा मुद्दा म्‍हणजे, विकटने डॅनियलीचा खून करण्‍यामागचा नेमका हेतू काय, हे अभियोग पक्ष पुढे आणू शकला नाही, असा दावा विकटच्‍या वकिलांनी केला होता. मात्र, कित्‍येकवेळा हा हेतू आरोपीच्‍या मनात दडलेला असतो. काहीवेळा तो बाहेर येत नाही. असे जरी असले तरी गुन्‍हा सिद्ध करणारे सबळ पुरावे पुढे आले तर दाेषी ठरविण्‍यासाठी खून करण्‍याचा हेतू काय, हे पुढे यायलाच पाहिजे याची गरज नाही.

या प्रकरणात विकट दोषी आहे, हे सिद्ध करणारे पुरेसे परिस्‍थितीजन्‍य पुरावे न्‍यायालयासमाेर आले आहेत. त्‍यातला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्‍हणजे, खून होण्‍यापूर्वी डॅनियलीला शेवटचे विकटबरोबर पाहिले होते. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. विकटबरोबर शेवटी ती दिसली होती. मात्र, त्‍यानंतर तिचे काय झाले याचे पुरेसे स्‍पष्‍टीकरण आराेपी देऊ शकला नाही, असे न्‍या. जोेशी यांनी स्‍पष्‍ट केले. न्‍यायालयासमोर (Court) जी साक्ष आली त्‍यात खुनाच्‍या आदल्‍या रात्री सुमारे १०.३० वाजता डॅनियली व विकट या दोघांना काहीजणांनी एकत्र पाहिले होते. न्‍यायालयात तशी साक्षही या साक्षीदारांनी दिली होती.

डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्‍यावर विकटने बलात्‍कार केला नाही तर तो एकमेकांच्‍या संमतीने आलेला शरीरसंबंध, असा दावा विकटच्‍या वकिलांनी केला हाेता. मात्र, हाही दावा खाेडून काढताना, जर हे संमतीने केलेले शरीरसंबंध होते तर डॅनियलीच्‍या अंतर्गत भागात दुखापतीच्‍या खुणा कशा दिसल्‍या आणि विकटच्‍या गुप्‍तांगावरही जखमांच्‍या खुणा कशा होत्‍या, असा सवाल न्‍यायालयाने करताना, हा बळजबरीनेच केलेला शरीरसंबंध हाेता, असे आदेशात म्‍हटले आहे.

संशयिताने पुरावे नष्‍ट करण्‍याचाही प्रयत्‍न केला, हे स्‍पष्‍ट करताना डॅनियलीची कपड्यावरून ओळख पटू नये म्‍हणून तिच्‍या अंगावरील सर्व कपडे काढून टाकले होते. आणि मृतदेहाचा चेहराही विद्रूप करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे पुरावे नष्‍ट करण्‍याचा संशयिताचा हेतूही सिद्ध होतो, असे न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

तपास अधिकाऱ्यांचे आणि अभियोग पक्षाचे अभिनंदन

1) आपल्‍या मुलीचा क्रूरपणे खून करून तिला आपल्‍यापासून हिरावून नेल्‍यामुळे डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्‍या आईला आणि अन्‍य कुटुंबीयांना ज्‍या यातना झाल्‍या त्‍या कशाहीप्रकारे कमी करता येणे शक्‍य नसले तरी डॅनियलीचा क्रूरपणे खून करणाऱ्या विकटला आठ वर्षांनंतर कडक शिक्षा झाली ही बाब तिच्‍या कुटुंबीयांना निश्‍चितच दिलासा देणारी असेल, अशी प्रतिक्रिया ‘बायलांचो एकवोट’ या संघटनेच्‍या अध्‍यक्षा आवदा व्‍हिएगस यांनी एका पत्रकाद्वारे व्‍यक्‍त करताना हा गुन्‍हा सिद्ध करण्‍यासाठी तपास अधिकारी आणि अभियोग पक्षाने जे काम केले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत, असे म्‍हटले.

2) या प्रकरणात सुरवातीला तपास करणारे पोलिस निरीक्षक फिलाेमिना काॅस्‍ता, उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, सरकारी वकील व्‍ही.जी. कॉस्‍ता, गोविंद गावकर, देवेंद्र कोरगावकर व संजय सामंत या सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या अभियोग पक्षाच्‍या संचालक पूनम भरणे तसेच अभियोग पक्षाला मदत करणारे डॅनियलीचे वकील ॲड. विक्रांत वर्मा हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. न्‍या. जाेशी यांनीही एक चांगला निवाडा दिला असल्‍याचे मत आवदा व्‍हिएगस यांनी व्‍यक्‍त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

SCROLL FOR NEXT