Goa Bench of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

Goa Court: गोव्यातील अवैध बांधकामांवर कारवाई करा!

Goa Court: बांधकामांची तपासणी करुन त्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेला अहवाल सादर करण्याचा आदेश काल खंडपीठाने दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Court: हणजूण समुद्रकिनारी परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली आहे. गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण व हणजूण पंचायतीने संयुक्तपणे या बांधकामांची तपासणी करून त्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेला अहवाल सादर करण्याचा आदेश काल खंडपीठाने दिला.

खंडपीठाने ही स्वेच्छा जनहित याचिका घेताना राज्य सरकारसह गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, हणजूण पंचायत व हणजूण पोलिस याला प्रतिवादी केले आहे. हणजूण येथील एका अवैध बांधकामप्रकरणी खंडपीठाने ते मोडण्याचा आदेश दिला आहे. याचिकादार रमेश मुजुमदार यांनी हे एकच बांधकाम खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

तसेच, अशाप्रकारची आणखी किती तरी बांधकामे, जी बेकायदेशीरपणे कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीसीझेडएमएने व हणजूण पंचायतीने अशा बांधकामांची तपासणी करावी व काय कारवाई केली याची माहिती पुढील सुनावणीवेळी द्यावी, असे स्पष्ट केले आहे.

गोवा खंडपीठाने मंगळवारी हणजूण येथील बेकायदा बांधकाम पाडण्याचा आदेश देण्याबरोबरच पाच लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिले होता. त्यानुसार रक्कम जमा आणि बांधकाम पाडल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंदर्भात जमीनदार आगुस्ता डिसोझा काल न्यायालयात हजर होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT