Goa Court Judgement Dainik Gomantak
गोवा

Goa Court Judgement: मागे बसलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू, कोर्टाने बाईक राईडरला ठरवले दोषी; काय दिली शिक्षा?

Goa News: पणजीतून मडगावच्या दिशेने जाताना २१ वर्षीय तरुणाच्या बाईकचा २०१८ साली अपघात झाला होता.

Pramod Yadav

पणजी: निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या २० तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोर्टाने बाईक राईडरला दोषी ठरवले आहे. कोर्टाने दुचाकी चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, एक वर्षांच्या बॉन्डवर त्याची सुटका केली आहे. वर्षाच्या कालावधीत त्याला चांगली वागणूक ठेवावी लागणार आहे. उत्तर गोवा कोर्टाने हा निकाल दिला आहे.

पणजीतून मडगावच्या दिशेने जाताना २१ वर्षीय तरुणाच्या बाईकचा २०१८ साली अपघात झाला होता. यात दुचाकीवर मागे बसलेल्या २० वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली होती. उपचारासाठी तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला होता. बेदरकारपणे दुचाकी चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. दरम्यान, संशयित तरुणाने हे आरोप फेटाळले आहेत.

 तरुण अपघात झाला त्यावेळी नशेत होता तसेच, त्याच्या निष्काळजीपणामुळे २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी वकिलांनी केली होती. तरुण नशेत असल्याचा आरोप कोर्टाने पुराव्या अभावी फेटाळला असून, अपघातावेळी तरुणाचे वय विचारात घेत, नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, तरुण त्याच्या कुटुंबीयांसाठी एकटाच कमवता असल्याचे कोर्टाने निर्णय देताना विचारात घेतले.

संशयित तरुण आयुष्याप्रती सकारात्मक आणि गंभीर असून, त्याला कठोर शिक्षा ठोठावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, अशाप्रकारच्या अपघात किंवा घटनांची नोंद त्याच्या नावे नाही. संशयित तरुणाला ठोठावलेल्या दंडाची रक्कम पीडित मुलीच्या कुटुंबीयांना द्यावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT