Goa Murder Case Dainiak Gomantak
गोवा

Goa Murder Case: स्वीडिश पर्यटकाच्या आईचा लढा अपयशी? कोर्टाकडून सीबीआयचा 'क्लोजर रिपोर्ट' मंजूर; हत्येचा पुरावा न मिळाल्यानं तपास बंद

Swedish Tourist Death Goa: अकरा वर्षांपूर्वी पाटणे-काणकोण येथे संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या स्वीडिश पर्यटक फेलिक्स दहाल (२२) यांच्या हत्येचा कोणताही पुरावा सीबीआयला न सापडल्याने हे प्रकरण बंदकेले होते

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: अकरा वर्षांपूर्वी पाटणे-काणकोण येथे संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या स्वीडिश पर्यटक फेलिक्स दहाल (२२) यांच्या हत्येचा कोणताही पुरावा सीबीआयला न सापडल्याने हे प्रकरण बंद करण्यासाठी ‘सीबीआय’ने काणकोण न्यायालयात सादर केलेला अर्ज काणकोणच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स्मिता सैल यांनी मंजूर केला.

ऑक्टोबर २०१४ साली गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या फेलिक्स यांचा मृतदेह २८ जानेवारी २०१५ रोजी पाटणे-काणकोण येथील एका रेस्टॉरंटपासून २०० मीटर अंतरावर खडबडीत रस्त्यावर सापडला होता. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिकांनी तो पाहिल्यानंतर पोलिसांना वर्दी दिली होती. सुरुवातीला काणकोण पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते. मात्र, फेलिक्स यांच्या आईने हा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिला होता.

जुलै २०१८ मध्ये हा मृत्यू खुनाचा प्रकार म्हणून नोंद करून हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्यात आले होते. दरम्यान, हे प्रकरण बंद करण्यासाठी सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात हा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याइतपत कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे नमूद केले होते. हा मृत्यू २०१५ साली झाला असून त्यानंतर बरीच वर्षे लोटली आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे तपास बंद करण्यासाठी सादर केलेला अर्ज मंजूर करण्यासारखा असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT